Jaynat PAtil-Chhagan Bhujbal  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात : छगन भुजबळ

Jaynat Patil-Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे. जयंत पाटील देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News :

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील भाजपमध्ये जातील असे दावे अनेक दिवसांपासून केले जात आहे. जयंत पाटील यांनी हे दावे वेळोवेळी खोडून देखील काढले. आता राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे. जयंत पाटील देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपाचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी नाशिकमधील सभेत केला होता. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, जयंत पाटीलच भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात आहेत. कित्येक महिन्यांपासून मी ऐकतोय आज उद्या. त्यांचं आधी फायनल होऊ द्या मग आपण ठरवू.

शपथविधी पहाटे करा रात्री करा. परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात. चर्चा सुरु आहे, याला तु्म्ही दुजोरा देत आहात. निवडणुका जवळ आल्या की बेडकं नाचणार आणि आवाज करणार, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. (Latest Marathi News)

काय म्हणाले होते जयंत पाटील?

भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत व्हायचं आहे. यासाठी भाजपकडून माझ्याभोवती जाळं फेकलं जात आहे. एका फोनवर माझ्यासाठी भाजपकडून पहाटेचा शपथविधी होऊ शकतो.

मात्र ज्यांनी मला राजकारणात मोठं केलं,माझं राजकीय जीवन फुलवले आहे, अशा शरद पवारांसाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. नाशिकमधील निफाड येथील शभेत ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT