Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांवर गुन्हा; कारवाईचं कारण ठरलेला VIDEO पाहा

Beed News : मनोज जरांगे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शिंदे साहेबांनी आपला विश्वास तोडलाय, असं म्हटल्याची नोंद फिर्यादीत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

Beed :

बीडच्या अंबाजोगाई येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांची व्यापक बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Manoj Jarange Patil
Beed : माजलगाव पंचायत समितीवर चिंचगव्हाण गावातील महिलांचा ठिय्या, 'ते' अतिक्रमण हटविण्याची मागणी

बैठकीत खोटी माहिती प्रसारित करणे, सरकारविरुद्ध प्रक्षोभक भाषा वापरणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असे आरोप जरांगेंवर करण्यात आलेत. मनोज जरांगेंसह बैठकीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकेच नाही तर ज्या मंगल कार्यलयात जरांगेंची बैठक होती त्या मंगल कार्यालयाच्या मालकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सदर बैठक काल रात्री ९ ला सुरू होणार होती. मात्र प्रत्यक्षात ही बैठक रात्री १० च्या पुढे सुरू झाली. मनोज जरांगे यांनी उपस्थित जनसमुदाय समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शिंदे साहेबांनी आपला विश्वास तोडलाय, असं म्हटल्याची नोंद तक्रारीत आहे.

तुमची हुशारी तुमच्या पाशी ठेवा मी कट्टर खानदानी व्यक्ती आहे. तुम्ही पालक आहात मग तरीही तुम्हाला अंतरवालीत महिला दिसल्या नाहीत का? त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या का केल्या ? त्या महिला तुमच्या कोणीच नाहीत का? तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा. पण आम्ही तुम्हाला हिसका दाखवणारच, असं जरांगे पाटलांनी म्हटल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

यावेळी एका मुलीच्या पायाला गोळी लागली तेव्हा तिला किती वेदना झाल्या. तिच्या कुटुंबीयांची काय परिस्थिती झाली. हे सर्व तुम्हाला दिसले नाही का, असंही जरांगे म्हणाले. जालना अंतरवलीच्या घटनेचा संदर्भात मुलीच्या पायाला अशी कोणतीही गोळी लागलेली नसताना, खोटी माहिती प्रसारित केली. तसेच सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने सरकार विरोधात प्रक्षेपक स्वरूपाचे भाषण केले, असा आरोप पोलीस कर्मचारी संतोष बदने यांनी केला आहे. यावरून जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil
Kolhapur Crime News : मद्यप्राशन करून हॉटेलमध्ये धिंगाणा, पोलीस प्रमुखांनी केलेली कारवाई चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com