jayant patil, uddhav thackeray, rajyasabha election result, rajyasabha election
jayant patil, uddhav thackeray, rajyasabha election result, rajyasabha election saam tv
महाराष्ट्र

Satara : जास्त काळजीचा विषय आहे असे वाटत नाही : जयंत पाटील

ओंकार कदम

सातारा : विधानसभेत शिवसेना (shivsena) ,राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेस (congress) यांच्याकडे मिळुन १५३ एवढी मतं आहेत. मात्र आम्हांला मिळालेल्या पाठींब्यावर आम्ही १६३ पर्यन्त आहोत. आम्हाला यापुर्वी सुद्धा मदत केलेल्या अपक्षांमधील ४ ते ५ लोकांच मत राज्यसभा निवडणुकीत दुस-या बाजुला गेल्याचे दिसत आहे. परंतु यात जास्त काळजीचा विषय आहे असे वाटत नसल्याचे मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. (jayant patil news)

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) हे आज (रविवार) सातारा (satara) जिल्ह्यातील माण तालुका दाै-यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बाेलताना मंत्री पाटील यांनी आमच्यात कोणताच अंतर्गत वाद नाही असे स्पष्ट केले. पाटील म्हणाले उलट आम्हाला अपक्षांचा पाठींबा मिळाला. त्यातल्या चार ते पाच लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही असं दिसतय. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) नाराजी होणं सहाजिक आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

त्यांचा (शिवसेनेचा) दुसरा उमेदवार निवडुन येणे गरजेचे होते मात्र तो आला नाही. झालेल्या मतदाना बाबत त्यांना खुलासा झाला असेल मात्र या बाबत त्यांचे आणि माझे बोलणं झाले नाही असेही पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

SCROLL FOR NEXT