'ना मास्क ना सोशल डिस्टंसिंग' तरीही जयंत पाटलांच्या तोंडून आनंद उद्गार विनोद जिरे
महाराष्ट्र

'ना मास्क ना सोशल डिस्टंसिंग' तरीही जयंत पाटलांच्या तोंडून आनंद उद्गार

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कडून सुरू असलेल्या परिसंवाद यात्रेला, परळीत तूफान गर्दी पाहायला मिळाली.

विनोद जिरे

बीड: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कडून सुरू असलेल्या परिसंवाद यात्रेला, परळीत तूफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यावेळी 'ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग', यामुळे सामाजिक न्याय मंत्र्यांच्याचं मतदारसंघांमध्ये कोरोनाला निमंत्रण दिलं जात असल्याचं चित्र काल रात्री पाहायला मिळालं. तर या स्वागतानंतर माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती; असे उदगार परळीकरांच्या जंगी स्वागतानंतर जयंत पाटील यांनी भावूक होऊन काढले. परळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम परळी येथिल हालगे गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास तुफान गर्दी पहावयास मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मतदार संघात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या स्वागताला संपूर्ण परळी शहर दिवाळी प्रमाणे सजवण्यात आले होते.

जागोजागी स्वागताचे बॅनर, चौकाचौकात जयंत पाटील यांचे 45 फुटी होर्डिंग लावण्यात आले होते. त्याचबरोबर चौकाचौकात डीजेसह, बँड ढोल तासे वाजवण्यात आले. तर यावेळी अतिषबाजीने संपूर्ण परिसर चमकून निघाला होता. यावेळी परळी मतदार संघातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर गर्दी करून डीजे च्या तालावर नाचताना दिसले तर खुद्द धनंजय मुंडेंसह जयंत पाटील यांनी सुद्धा मास्क न लावताच कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करतांना दिसून आले. कोरोनाचे नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांना आहेत का? ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कोरोनाचे नियम लागू नाहीत का? पोलीस प्रशासन मंत्र्यांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करणार का? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उठत आहे. दरम्यान परळीकरांच्या या स्वागतानंतर जयंत पाटील हे भावुक झाले अन "माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती " असं म्हणाले...!

एका बाजूला बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना तात्काळ सरकार मार्फत मदतीची आवश्यकता आहे आणि या संकटाच्या परिस्थितीत मात्र बीड च्या पालकमंत्र्यांना मात्र शेतकऱ्यांशी काहीच देणे घेणे नसल्याचेही जनतेतून बोलले जात आहे. करोडो रुपये खर्च करून हा परिवार संवाद यात्रा भरवण्यापेक्षा हेच पैसे नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या मदतीसाठी दिले असतेतर काही बिघडले असते का? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT