Jayant Patil Ed Inquiry Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil Ed Inquiry: राष्ट्रवादीत मोठी गटबाजी उघड? जयंत पाटलांना समर्थन देण्यावेळी बडे नेते गायब

राष्ट्रवादीत मोठी गटबाजी उघड? जयंत पाटलांना समर्थन देण्यावेळी बडे नेते गायब

Rashmi Puranik

Jayant Patil Ed Inquiry: राष्ट्रवादीमध्ये मोठी गडबाजी उघड झाल्याचं आता समोर येताना दिसत आहे. याच कारण म्हणजे जयंत पटली यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असल्याची बाब उघड झाली आहे. जयंत पाटील यांना समर्थन देण्यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते गायब असल्याचं दिसून आलं.

एकीकडे सोमवारी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशा सुरु असताना राज्यभरात त्यांचे समर्थक निदर्शने करत होते. तर दुसरीकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची चौकशी सुरु असताना देखील बडे नेते हे गायब असल्याचं दिसून आलं होत. यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशी सुरु झाली तेव्हा सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि राज्यभर आंदोलनं झाली. असं असलं तरी प्रदेश कार्यालय आणि इतर ठिकाणी कुठलेही आमदार दिसून आले नाही. इतकेच नाही तर जे मोठे नेते आहेत, ते देखील दिसले नाहीत.  (Latest Marathi News)

यातच जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे हे जयंत पाटीलांच्या समर्थानात दिसले. मात्र इतर नेते त्यांच्या समर्थानात दिसले नाही. यामुळे राष्ट्रवादीमध्ये गटबाजी सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ईडीकडून जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी

दरम्यान, ईडीकडून जयंत पाटील यांची साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'आज तुम्ही दिवसभर थांबला. महाराष्ट्रातील गावातून येथे येऊन दिवसभर समर्थन दिलं. माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. पक्षाला समर्थन दिलं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे'.

'ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिले आहेत. ईडीकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील. नागरिक म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलं आहे. दिवसभरात मी अर्ध पुस्तक वाचून काढलं आहे', असेही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT