PM Modi Australia Visit: मोदी एअरवेज ते मोदी एक्सप्रेस... सिडनीत नरेंद्र मोदींची क्रेझ, भाषणासाठी चाहते आतुर

Australia News: सिडनीमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाची प्रचंड क्रेझ
PM Modi Australia Visit
PM Modi Australia VisitSaam Tv
Published On

PM Modi Australia Visit News Update Today: भारताचे पंतप्रधान मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. तब्बल नऊ वर्षांनी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. याआधी जपान आणि पापुआ न्यू गिनिआ या देशांना मोदींनी भेटी दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी सोमवारी ऑस्ट्रेलिया येथे दाखल झाले असून यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियनसुपरचे सीईओ आणि हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्ष गीना राइनहार्ट यांची भेट घेतली. या भेटीनंतर या ऑस्ट्रेलिया नेत्यांची पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षावर केला आहे. (Latest Marathi News)

PM Modi Australia Visit
Unseasonal Rain News : सातारा, साेलापूरला पावसानं झाेडपलं; काेल्हापूरात मंडप काेसळला, पाहूणे मंडळी जखमी

सिडनीत आल्यावर भारतीय समुदायाकडून पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांचे जोरदार स्वागत केले. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये पंतप्रधान मोदी आज हजारो नागरिकांना संबोधित करणार आहेत. ज्यासाठी लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

पीएम मोदींच्या या शोसाठी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) कानाकोपऱ्यातून भारतीय नागरिक सिडनीत दाखल झाले आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियातील भारतीयांनी पीएम मोदींचे भाषण ऐकण्यासाठी एक फ्लाइट बुक केली, ज्याचे नाव मोदी एअरवेज आहे. क्वान्टास एअरच्या या फ्लाइटमध्ये विविध समुदायातील भारतीय प्रवासी सिडनीमध्ये दाखल झाले आहेत.

मोदी एअरवेजशिवाय सिडनीला जाण्यासाठी विशेष बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे. क्वीन्सलँड येथून सुटणाऱ्या या बसेसचे नाव मोदी एक्सप्रेस असे ठेवण्यात आले आहे. मेलबर्नमधून मोठ्या संख्येने लोक सिडनीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. (Narendra Modi)

PM Modi Australia Visit
Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

विमानतळावर जोरदार स्वागत

पीएम मोदींचे ऑस्ट्रेलियात आगमन होताच लोकांनी गाणी गाऊन त्यांचे खास स्वागत केले, यावेळी महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण भारतीय वेशभूषेत दिसले. पंतप्रधान मोदी विमानतळावर उतरताच संपूर्ण विमानतळ वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमून गेला. पीएम मोदींनीही आपापल्या खास पद्धतीत सर्वांचे आभार मानले.

पीएम मोदींचे वेळापत्रक

पीएम मोदी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पीएम मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, मोदींनी ऑस्ट्रेलियातील मोठ्या कंपन्यांचे सीईओ आणि प्रमुख व्यावसायिक व्यक्तींची भेट घेतली होती. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com