Jayakwadi Dam Water Leval Today Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Dam Water : खुशखबर! जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत तब्बल 10 टक्क्यांनी वाढ; मराठवाड्याला मोठा दिलासा

Satish Daud

गेल्या 48 तासांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन आठवड्यात जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) तब्बल 10 टक्के पाणी जमा झालंय. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता 14 टक्क्यांवर पोहचला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय.

रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड, निळवंडे, गंगापूर, ओझरवेर, दारणा, भावली कडवा, नागमठाण, नांदूर मध्यमेश्वर, भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये सध्या पाण्याचे आवक वाढली आहे. सध्या जायकवाडी धरणात जवळपास 20 हजार क्युसेक्स आवक सुरू आहे. सध्याचा जायकवाडी धरणातील पाणीसाठा पाहता पुढील 8 महिने पिण्यासाठी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारपासून काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळतोय तर छोटी तळे, ओढ्यात पाणी जमा होऊ लागलंय. नाशिक जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने जायकवाडी धरणातील आवक वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यात मात्र धरणाची अद्यापही जैसे थे स्थिती आहे.

नाशिकमध्ये 48 तासांत मुसळधार पाऊस

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलंय. देवमाळ ते अंबडदहाड नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे दळणवळणाची सोय बंद झाली आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य झालं आहे. जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT