श्रावण शुक्लपक्ष. श्रावण मासारंभ. शिवमुष्टि तांदूळ. तिथी - प्रतिपदा १८|०४ पर्यंत रास - कर्क १५|२२ नं सिंह. नक्षत्र - आश्लेषा. योग-व्यतीपात. करण - बव. दिनविशेष - ११ नं. चांगला
करिअरसाठी दिवस जरा धावपळीचा राहील. नवीन मिटिंग होतील. नवीन संधी व संबंध प्रस्थापित होतील. त्यापासून पुढील कामाचा मार्ग सुकर होईल. मैत्रीपूर्ण रिलेशन व्यवसायामध्ये योग्य ठरतील.
जुनी गुंतवणुक फायदेशीर ठरेल. पैशाची निगडित व्यवहार करणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे. नातेवाईकांबरोबर चांगले संबंध राहतील.
परदेशगमनाची आज आखणी कराल .नवीन स्वप्न रंगवाल. स्वप्न वृद्धिंगत होतील. काही अडथळे येतील पण त्या दूर सारावे लागतील. सकारात्मकता ठेवावी लागेल तर दिवस बरा जाईल.
इतरांवर प्रेमाचा वर्षाव कराल. त्यामधूनच आपल्याला आनंद मिळेल. काही गोष्टी फायद्याच्या ठरतील असे व्यवहार होतील. सकारात्मकता वाढेल. आरोग्य चांगले राहील.
आपली उदारता आज जरा सिमित ठेवलं तरच बरे राहील. पैशाचा खर्च वाढेल. जाण्यापेक्षा येण्याचा विचार अधिक करा. पैशाची गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल.
"प्रेमाने जग जिंकता येतं" हे आज जाणवेल. खंबीरपणे काही पावले उचला आणि ते फायदेशीर ठरतील. छोटे प्रवास घडतील. विष्णू उपासना करा.
श्रावणी सोमवार आहे घरामध्ये धार्मिक कार्य घडेल. त्यामध्ये आपण आनंदाने सहभाग घ्याल .घरचे वातावरण हसरे खेळते राहील. नवीन निर्णयाचे स्वागत करा.
शिव उपासना फायद्याची ठरणार आहे तांदुळाची शिवामूठ देवाला वाहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील. शेअर आणि लॉटरी मधील गुंतवणूक पूर्णत्वास जाईल. प्रेमासाठी सकारात्मकता घेऊन आलेला आजचा दिवस आहे.
आजोळी संबंध दृढ होतील. मामा बरोबर काही व्यवहार होतील. पण आपलं कोण आणि परक कोण हे आज ओळखण्याचा दिवस आहे. "चोरावर मोर होऊन राहावे लागेल".
कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. नको त्या लोकांची लुडबुड आयुष्यात आज खपवून घेऊ नका. काही गोष्टी स्पष्ट बोलल्या तर हिताच्या ठरतील. प्रवास घडतील.
कारण आणि विनाकारण काळजी ग्रासेल. गूढ गोष्टींविषयी आवड निर्माण होईल. मृत्यू भय दाटून येईल. शिवउपासना करावी फायदा होईल.
देवळामध्ये तांदूळ आणि बेल ठेवून विशेष उपासना करावी. दिवस चांगला राहील. पुढील भाग्यकारात घटनांसाठी ही उत्तम संधी असणार आहे. मंदिरातली सकारात्मकता आपल्याकडे येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.