Jay Pawar Wedding Saam Tv
महाराष्ट्र

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

Jay Pawar-Rutuja Patil Wedding in Bahrain: जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा ५ डिसेंबरला होणार आहेत. परदेशात त्यांचे लग्न होणार आहे. यासाठी ४०० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Siddhi Hande

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं लग्न

५ डिसेंबरला जय पवार अडकणार लग्नबंधनात

बहरिनमध्ये होणार शाही विवाहसोहळा

४०० पाहुण्यांना निमंत्रण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जय पवार यांचा या आठवड्यात लग्नसोहळा आहे. नुकताच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांचा शाही विवाहसोहळा झाला. त्यानंतर पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. जय पवार हे ऋतुजा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत.

जय पवारांचा विवाहसोहळा कधी? (Ajit Pawar Wedding Date and Venue)

जय पवार यांचे लग्न ५ डिसेंबर रोजी होणार आहे. ४,५ आणि ७ डिसेंबर रोजी लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत लग्नाच्या कार्यक्रमाची रुपरेखा देण्यात आली आहे. यामध्ये हळद, मेहंदी,लग्न, रिसेप्शन अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश आहे.

कुठे होणार शाही विवाहसोहळा? (Jay Pawar Wedding In Bahrain)

अजित पवारांच्या मुलाचं लग्न बहरीनमध्ये होणार आहे. यासाठी ४०० जणांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पवार आणि पाटील कुटुंबाचा समावेश आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा समावेश आहे. हा सोहळा मोठा असला तरीही निमंत्रित केलेल्या पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.

कसा असणार लग्नसोहळा? (Jay Pawar Wedding Invitation)

४ डिसेंबर- मेहंदी

५ डिसेंबर-हळद, वरात आणि लग्नसोहळा

६ डिसेंबर- संगीत

७ डिसेंबर- स्वागत समारंभ

पवार कुटुंब राहणार उपस्थित

या विवाह सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु आहे. अजित पवार हे निवडणुकीची कामे आटपून विवाहसोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण पवार कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT