Suraj Shelke, Satara, Khatav
Suraj Shelke, Satara, Khatav saam tv
महाराष्ट्र

'वीर जवान सूरज शेळके' अमर रहे जयघाेषाने निनादला खटाव; पहाटे झाले अंत्यसंस्कार

ओंकार कदम

सातारा : भारतमाता की जय, वीर जवान तुझे सलाम, अमर रहे अमर रहे वीर जवान सुरज शेळके (suraj shelke) अमर रहे अशा घाेषणा देत भावपुर्ण वातावरणात सातारा (satara) जिल्ह्यातील खटाव (Khatav) येथील हुतात्मा सुरज शेळके यांच्यावर पहाटेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (suraj shelke latest marathi news)

लेह लडाख येथे सेवा बजावत असताना शेळके यांना वीर मरण आले होते. वीर जवान सुरज शेळके यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी खटाव येथे आणण्यात आले. खटाव येथे पार्थिव पोहोचल्यानंतर वीर जवान सुरज शेळके यांचे कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतले यानंतर गावातून (village) त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या (indian army) वतीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडून वीर जवान शेळकेंना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.

वीर जवान सुरज शेळके यांचे वडील प्रताप व बंधू गणेश यांनी पार्थिवाला मुखअग्नी दिला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली, ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT