Today's Marathi News Live: निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, ना की धर्म, जातीपातीवर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंनी सुनावलं

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (17 may 2024): लोकसभा निवडणूक, देश-विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
Maharashtra's Live News in Marathi By Saam TV
17 May 2024 Latest Updates PM Narendra Modi, raj thackeray , uddhav thackeray Saam TV

निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, ना की धर्म, जातीपातीवर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंनी सुनावलं

निवडणुकीच्या रणधुमाळीत एक हजार रुपये कापसाचा भाव कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाचे लाट नाही याबाबत मला आश्चर्य वाटलं. निवडणूक सुरु झाली आणि कापसाचे भाव हजार रुपये कमी झाले तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातलाय. निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामा नये ती आमच्या हक्कावर आमच्या वेदनेवरण गरजेचे हल्ली ते दिसत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी कल्याणात व्यक्त केली.

बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

बाळासाहेबांनी तुम्हाला पडत्या काळात मदत केली

तुम्ही ते उपकार विसरले असतील

पण महाराष्ट्र हे उपकार विसणार नाही

तुम्ही भटकती आत्मा म्हणतात हा आत्मा तुम्हाला सत्तेखाली खेचल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगतो

INDIA Alliance : दिल्लीत हरवता येत नाही म्हणू माझ्या अटकेचं कारस्थान, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

दिल्लीत मोदी आपला हरवू शकत नव्हते

म्हणून मला अटक केली

मी राजीनामा दिला नाही

मी तुरुंगातून सरकार चालवलं

भ्रष्टाचार करा, भाजपात या मग सगळं माफ, ही मोदींची गॅरंटी असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

भ्रष्टाचार करा, भाजपात या मग तुम्हाला सगळं माफ

ही आहे मोदींची गँरंटी

केजरीवाल यांना कोणीतरी बोललं म्हणून त्यांना अटक केली

इकडं आमदार गणपत गायकवाड यांनी वक्तव्य केलं की शिंदेंकडे त्यांचे कोटी रुपये आहेत

मग का ईडी मिंधेंची चौकशी करत नाही

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात मुंबईचं मोठं योगदान ; नरेंद्र मोदी

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात मुंबईचं मोठं योगदान राहिलं आहे. त्या मुंबईचं स्वप्न घेऊन आलो आहे. २०१४ मध्ये आपली अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती ती ५ व्या स्थावर आणण्याचं काम केलं.

शिवाजी पार्कवरच्या सभेत बाहेरचे लोक; नाना पटोले यांची टीका

शिवाजी पार्कच्या सभेत बाहेरचे लोक आणलेत

मुंबईतले लोक तिथं नाहीत

तेच ते रटाळ भाषण करतील

मुंबई लुटण्याचा प्रयत्न सुरुय

बुलेट ट्रेन त्यासाठी केली जातेय

शहीद कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद कर्नल वैभव काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

Raj Thackeray : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार; राज ठाकरे

विरोधक सत्तेचच नाही आहेत, मग त्यांच्यावर सारखं का बोलायचं हा प्रश्न आहे. मात्र नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

PM नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल, शिवतीर्थावरून करणार संबोधित

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शिवतिर्थावर NDA ची आज जाहीर सभा होत आहे. नरेंद्र मोदींचं सभास्थळी आगमन झालं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित आहेत.

मिहीर कोटेंच्या कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राडा, पैसे वाटप केल्याचा आरोप

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयासमोर शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांकडून राडा कार्यालयाच्या समोरच पैसे वाटप केल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून आरोप घटनास्थळी पोलीस दाखल

४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत; संजय राऊत

आपल्या आघाडीतल्या सर्वांचे झेंडे इथं फडकत आहे

४ जूननंतर मोदी भूतपूर्व पंतप्रधान होणार आहे

मोदी बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत

हे करु नका, त्यामुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होईल

मुंबईतल्या सहापैकी सहा जागा इंडिया आघाडी जिंकेल; विजय वेडट्टीवार

विदर्भातल्या १० पैकी १० जागा इंडिया आघाडी जिंकत आहे

लोकांची घरे फौडली

सेनेचा दरवाजा चोरला, राष्ट्रवादीचा दरवाजा चोरला

आमची खिडकी चोरली

ज्याला कडेवर घ्यायची चर्चा होती त्याचा झरोकाही चोरला

१० वर्षात काम केलं असतं तर ही वेळ आली नसती

वडेट्टीवार

मुंबईतल्या सहापैकी सहा जागा इंडिया आघाडी जिंकेल

राज ठाकरेंना एक सेलिब्रिटी म्हणून बघितलं जातं

भाजपनं या सेलिब्रिटीला किती बिदागी दिली मला माहिती

PM Narendra Mode : पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमीवर दाखल

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शिवतिर्थावर आज जाहीर सभा होत आहे. दरम्यान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी चैत्यभूमीवर दाखल झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलं.

महायुतीच्या सभेला सुरुवात; राज ठाकरे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभे ठिकाणी दाखल

शिवाजी पार्कावरील महायुतीच्या सभेला सुरुवात झाली असून अजित पवार आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल झाले आहेत. रामदास आठवले भाषण करत असून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला मारलाय.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचले राज ठाकरे यांच्या निवासस्थानी

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शिवतिर्थावर आज जाहीर सभा होत आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवास्थानी पोहोचले आहेत.

महादेव बुक अँप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

महादेव बुक अँप या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग अँपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप,मोबाईल व इतर साहित्य ६२ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ९३ आरोपी घेतले ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी कारवाई

५० लाखांची रोकड दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिल्लेखाना चौकात 2 व्यक्ती दुचाकीवरून काही रोकड घेऊन जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने शिल्लेखाना चौकात सापळा लावत त्या दोघांना ताब्यात घेतलं असून ५० लाखांची रोकड जप्त केली आहे.

कागल तालुक्यातील आनूर येथील चौघांचा वेदगंगा नदीत बुडून मृत्यू

आनुर ता.कागल येथील यात्रेसाठी आलेल्या चौघांचा वेदगंगा नदीत बुडुन मृत्यू

जितेंद्र लोकरे (वय 40) व त्यांचा मुलगा (वय 15) ( मृतदेह अद्याप सापडलेले नाही ). अथणी - रेश्मा (वय 40) रुकडी - सविता (वय 35)

आणूर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आलेले नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

INDIA Alliance : इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची सांगता शनिवारी होत असताना आज इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर सांगता सभा होत आहे. मोठ्या शक्तिप्रदर्शनाची इंडिया आघाडीकडून तयारी करण्यात आली असून आजच्या सभेतून इंडिया आघाडी काय नारा देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बिकेसी मैदानात जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

Delhi Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवरील निकाल कोर्टाने ठेवला राखून

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण

अरविंद केजरीवाल यांनी ED ne केलेल्या बेकायदेशीर अटके विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल कोर्टाने ठेवला राखून

या प्रकरणातील पक्षकारांना जर आपल लेखी म्हणण मांडायच असेल तर कोर्टाने दिला एक आठवड्याचा वेळ

एका आठवड्यात ते सत्र न्यायालयात आपल म्हणणं मांडू शकतात - कोर्ट

दरम्यान आज झालेल्या सुनावणी वेळी ED ne कोर्टात महत्वाचा दावा केला

केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील chat सापडल्याचा दावा केलाय

त्यांनी (केजरीवाल) यांनी त्यांचे संभाषण नष्ट केले... पण आम्हाला हवाला ऑपरेटर्सकडून या chat मिळाल्या आहेत

ED chya वतीने SG यांनी कोर्टात हा दावा केला

अमरावतीत अनधिकृत होल्डींगवर कारवाई सुरू

अमरावती महानगरपालिका हद्दीत 396 होल्डींग आहेत यापैकी 147 अनधिकृत होल्डींग असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली तर काल पासून शहरातील अनधिकृत होल्डींग काढण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली,लवकरच संपूर्ण अनधिकृत होल्डींग काढण्यात येणार असं मनपाने सांगितले

Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

किल्ला कोर्टाने केली भिंडेची रवानगी पोलीस कोठडीत

पोलिसांनी मागितली होती १४ दिवसांची कोठडी

उदयपूर वरून अटक करण्यात आलेल्या भिंडे ला आज करण्यात आल होत कोर्टात हजर

सोमवारी घाटकोपरला झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा नाहक मृत्यू तर अन्य ८० काम झाले होते जखमी

INDIA Alliance : अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांचा जुहू ते भिवंडी एकत्र प्रवास

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबई जुहू ते भिवंडी इथपर्यंत एकत्रित प्रवास

थोड्याच वेळापूर्वी अरविंद केजरीवाल यांच मुंबईत आगमन झालं त्यानंतर जुहू येथून हेलिकॉप्टरने शरद पवार आणि केजरीवाल एकत्रित भिवंडीला रवाना झालेत

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण

आम आदमी पक्षाला या घोटाळ्यात आरोपी केलंय

ED ची सुप्रीम कोर्टात माहिती

आज आप वर चार्जशीट दाखल केली जाईल, त्याच काम सुरू - ED

मनीष सिसोदिया, संजय सिंह, अरविंद केजरीवाल यांच्या नंतर आता पक्षावर कारवाई होण्याची शक्यता

वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा बंद

वरंध घाटात रस्त्याचे दुपदरीकरणं, संरक्षक भिंत बांधणे  तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामं सुरू आहेत, ही कामे सुरू असताना अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव 1 एप्रिल पासून 30 मे पर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांना पुण्यात पोलीस दल देणार मानवंदना

गाझामध्ये बॉम्ब हल्यात मारले गेलेले कर्नल वैभव काळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील कल्याणी नगरमधील त्यांच्या घरी आणण्यात आलय. पोलीस दलाकडून कर्नल काळे यांना शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे.

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच

सोरेन यांना अंतरिम जामीन कोर्टाने नाकारला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा अशी मागणी सोरेन यांनी केली होती

सोरेनला यांना निवडणुकीच्या खूप आधी अटक करण्यात आल्याचं ED ने कोर्टात सांगितल

20 मे ला लोकसभेच्या पाचव्या टप्यासाठी मतदान होत आहे

Mumbai High Court : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

⁠मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

⁠एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

सीबीआय च्या खटल्यामध्ये भोसले यांना हायकोर्टाने दिला जामीन

⁠मात्र आणखीन एका केस मध्ये जामीन होणे बाकी असल्याची माहीती

अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयाचा निकाल- संपतीच्या वादातून बहिनेनंचं पतीच्या आणि पोटच्या दोन मुलाच्या मदतीनं 2 सख्या भावांना आणि त्यांच्या मुलाला संपवलं आहे.

ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांना महिला कार्यकर्त्यांकडून घरात घुसून मारहाण

अयोध्या पौळ यांनी यामिनी जाधव यांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

पौळ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आरोप केला आहे.

Sangli News : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

सांगलीत कॅफे शॉप तोडफोड प्रकरणी 16 जणांना घेण्यात ताब्यात आले, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोकर यांची माहिती दिली. अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून शहरातील 3 कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली आहे .

पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Pune Breaking News: पुण्यातून एक महत्वाची बातमी. पुणे शहर शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहित सामुहिक राजीनामे दिले आहेत. उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे

Nashik News : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर पोहोचले.

भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीला आल्याचं बोललं जात आहे.

मागील १ तासांपासून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात शरद पवार गटाच्या जयकुमार शिंदेंनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला आहे.

त्यांनी परिस्थितीला हतबल होऊन राजीनामा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने आत्महत्या केली होती.

यावेळी हसन मुश्रीफ यांनी मदत न केल्याचा आरोप त्यांनी केला

Sangli News :  शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून कॅफेची तोडफोड; 8 ते 10 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आठ ते दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील तीन कॅफेची तोडफोड केली होती.

Pune News : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

पुण्यात मतदान होताच पुन्हा गुन्हेगारी वाढली

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा टोळक्याकडून हत्या केली.

सहा जणांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या केली.

डहाणूकर कॉलनीत काल रात्री घडला धक्कादायक प्रकार.

Sangli News : सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक; तीन कॅफेशॉप फोडले

कॅफे शॉपमधील अश्लील प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक झाला आहे.

सांगलीतील कॅफे शॉपवर हल्लाबोल करत संतप्त शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली आहे.

सांगलीत आतापर्यंत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने तीन कॅफे फोडले आहेत.

Pune News : पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा

पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर चंदन नगर पोलिसात गुन्हा दाखल

संतोष भंडारी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव

ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एका 64 वर्षे ज्येष्ठ नागरिकांने आरोपी संतोष भंडारी यांच्या छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीमध्ये दहा लाख रुपयाची ठेवी ठेवली होती.

आरोपीने या ठेवलेल्या रक्कमेवर त्यांचा परतावा न देता त्यांची फसवणूक केली.

Ghatkopar Hording Accident :  घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आज किल्ला कोर्टात भावेश भिंडेला हजर करण्यात येणार आहे.

उदयपूरवरून गुन्हे शाखेने अटक केली होती.

Dharashiv News : धाराशीवमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, झाड कारवर कोसळलं

धाराशिवमध्ये भलंमोठं झाड कारवर कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

धाराशिव शहरातील पाटबंधारे कार्यालयासमोर दुर्घटना घडली आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी नाही.

गाडीत कोणी नसल्याने दुर्घटना टळली आहे.

PM Modi News : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. मोदी यांचं 6 वाजून 20 मिनिटांनी मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. नरेंद्र मोदींच्या सभेला सायंकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सीएनजी इंधनाचा मोठा तुटवडा

सीएनजी मिळवण्यासाठी कशा प्रकारे वाहनांची लाईन लागतेय, याचा व्हिडिओ समोर आलाय.

राजापूरमधल्या सीएनजी स्टेशनवर चारचाकी गाड्यांसाठी भलीमोठी लाईन

सीएनजीसाठी लागलेल्या लाईनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

Pune Accident: शेवाळेवाडी येथे ओव्हरलोड कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

शेवाळेवाडी येथे ओव्हरलोड कंटेनरचा अपघात झालाय. चालक आणि क्लीनर अपघातात मृत झाले आहेत. रात्रीच्या सुमारास अपघात घडला. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

Ghatkopar Hording Accident : आरोपी भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करणार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा मुख्य आरोपी भावेश भिंडेला घेऊन गुन्हे शाखेचे पथक मुंबईत दाखल होणार आहे. काल उदयपुरवरून अटक करण्यात आली होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला जेरबंद केलं आहे. आज भावेशला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Sharad Pawar News : नाशिकमध्ये मोदींच्या सभेत घोषणा देणारा तरुण शरद पवारांच्या भेटीला

पंतप्रधान मोदींच्या सभेत कांद्यावर बोला घोषणाबाजी करणारा तरुण शरद पवारांच्या भेटीला किरण सानप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे. काल शरद पवारांनी घोषणा देणारा तरुण माझ्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान असल्याचं म्हटलं होतं. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर किरण सानप पवारांच्या भेटीला

Nashik lok Sabha : नितीन गडकरी आणि आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

आज नितीन गडकरी आणि आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी नितीन गडकरी सभा घेणार आहेत. तर आदित्य ठाकरे देखील महाविकास आघाडीसाठी मैदानात उतरले आहेत. नितीन गडकरी यांची चांदवड आणि नाशिक शहरात आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी नाशिकच्या सिडको परिसरात सभा होणार आहे.

Pune News : पुण्यात ९ जाहिरात फलक जमीनदोस्त

पुणे महापालिकेकडूनही आयुक्तांच्या आदेशानुसार दिवसभरात ९ जाहिरात फलक जमीनदोस्त

कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ५,

वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीताल ३

वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com