MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

MI vs LSG, Live Updates: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे
MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज
mi vs lsg live updates mumbai indians need 215 runs to win amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा दोन्ही संघांचा या हंगामातील शेवटचा सामना आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाने २० षटकअकखेर २१४ धावा केल्या आहेत.

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या प्लेइंग ११ मध्ये बदल केला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्याऐवजी अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. तर रोहित शर्माचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली होती. देवदत्त पडिक्कल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर मार्कस स्टोइनिसने २८ आणि दिपक हुड्डाने ११ धावांची खेळी केली. संघ अडचणीत असताना केएल राहुल JEUGNआणि निकोलस पुरनने डाव सांभाळला. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं. लखनऊकडून निकोलस पुरनने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर तर केएल राहुल ५५ धावा करत माघारी परतला.

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज
IPL 2024 Playoff Prediction: ४ संघ ५ सामने! RCB की CSK? कोण जाणार प्लेऑफमध्ये?

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, नुवान तुषारा, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर.

इम्पॅक्ट प्लेअर्स – रोहित शर्मा, आकाश मधवाल, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, कुमार कार्तिकेय

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, मॅट हेन्री, रवि बिश्नोई, मोहसिन खान, अरशद खान

इम्पॅक्ट प्लेअर्स – नवीन-उल-हक, अ‍ॅश्टन टर्नर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com