Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Lok Sabha Election 2024 : प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. मात्र प्रमोद महाजन आज असते तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी कधीही नसते, असा घणाणात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केला.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

नरेंद्र मोदी घराणेशाहीवर बोलत आहेत, मात्र यांना पक्ष फोडून भाजपमध्ये गेलेल्याची घराणेशाही चालते. त्यांचा मुलांना उमेदवारी दिली जाते. त्यावेळी मोदी मूग गिळून का असतात. प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. मात्र प्रमोद महाजन नसते तर भाजप शिवसेना य़ुती झाली नसती आणि आज ते असते तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी कधीही नसते, असा घणाणात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केला.

भ्रष्टाचार करा, भाजपात या मग तुम्हाला सगळं माफ, ही आहे मोदींची गॅरंटी आहे. केजरीवाल यांना कोणीतरी बोललं म्हणून त्यांना अटक केली. इकडे आमदार गणपत गायकवाड यांनी वक्तव्य केलं की शिंदेंकडे त्यांचे कोट्यवधी रुपये आहेत मग शिंदेंची ईडी चौकशी का करत नाहीत? असा सवाल त्यांनी केला

मी काही गुजरातींवर बोलतो पण गुजराती गुजराती जनतेच्या विरोधात नाही. मात्र काही जण मराठी माणसाचा द्वेश करतात. कोराना काळात ट्रेन दिल्या नाहीत. उत्तर प्रदेशात गंगा माता रडत होती तेव्हा त्यांचे अश्रु पुसायला का गेले नाहीत. चीनने आपली जमीन हडपली आहे, मात्र त्याबद्दल ‌मोदी बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : इंडिया आघाडीतील कोणाला पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्न?; एकनाथ शिंदेंनी नाव घेत शिवतीर्थावरून केली सडकून टीका

लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली आहे, त्याकडे कुणी पाहायला तयार नाही. पण आम्हाला पराभूत करण्यासाठी भाजपची सगळी फौज इकडे आली आहे. मात्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी हा मोदी-शाहांचा महाराष्ट्र होणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे ही पहिली अशी निवडणूक आहे, ज्यामध्ये मोदींना प्रचाराची दिशा सापडत नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले

Maharashtra Politics 2024
Raj Thackeray: आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com