Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Jarange Patil: जरांगे पाटील यांच्या सभेवेळी जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू

Jarange Patil News: दुर्दैवाने गोकुळचे निधन झाल्यामुळे समस्त मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Ruchika Jadhav

अजय सोनवणे

Jarange Patil News:

एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एका कार्यक्रमात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची येवल्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. यावेळी झालेल्या अपघातामध्ये गोकुळ रावसाहेब कदम हा तरुण जेसीबीमधून खाली पडला होता.

खाली पडल्याने त्याला बरीच दुखापत होऊन तो जखमी झाला होता. गेल्या २५ दिवसांपासून त्याच्यावर कोपरगाव येथे उपचार सुरू होते. दुर्दैवाने गोकुळचे निधन झाल्यामुळे समस्त मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज गोकुळवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठा आरक्षण उपसमितीची आज तीन वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आलीये. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाणार आहे. तसेच आरक्षणाबाबत पुढे काय पाऊल उचलावे यावर चर्चा होणार आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवलं असलं तरी ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT