Jarange On Narayan Rane Saam Digital
महाराष्ट्र

Jarange On Narayan Rane : 'भुजबळ गायब, नारायण राणे येतायेत'; टप्प्यात येऊ देत करेक्ट कार्यक्रम करतो, जरांगेंचं खुलं आव्हान

Manoj Jarange Patil On Narayan Rane : मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता जागृती रॅली आज सोलापुरात आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Sandeep Gawade

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर शांतता जागृती रॅली सुरू केली आहे. जरांगेंची यात्रा आज सोलापुरात असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. माझ्याविरोधात टोळ्या उभे केल्या जातायेत, छगन भुजबळ यांच्यानंतर नारायण राणे यांना कोकणातून धाडलं जात आहे. मात्र छगन भुजबळ १५ दिवसांपासून गायब आहेत आणि मराठवाड्यात कोणता मोठा नेता आला तरी मी घाबरत नाही, असं म्हणत जरांगेंनी थेट आव्हान दिलं आहे.

२०२४ ला कोणाला बसवायंच हे मराठे ठरवतील

मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जागृती शांतता रॅली सोलापुरात दाखल झाल्यानंतर वारकरी फेटा घालून माराठा बांधवांनी जरांगेंचा सन्मान केला. दरम्यान या रॅलीला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी भर पावसात त्यांनी रॅलीला संबोधित केलं. जे राजकारणात आहेत ते कधीच खाली बसणार नाहीत मात्र आता 2024 ला कोणाला बसवयचं हे मराठ्यांनी ठरावयाच आहे. माझा समाज संकटात सापडला आहे

म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न

ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनी आपल्याला संकटात आणलं आहे. मी यांना मॅनेज ही होत नाही त्यामुळे ते माला बदनाम करत आहेत.माझ्या मराठ्यांची लेकरं अधिकारी बनले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे.समाजाचा स्वाभिमान गहाण ठेऊन जगणारी माझी पैदास नाही. प्रचाराला मराठ्यांची पोर पाहिजे त्यामुळे राजकारणी लोक आरक्षण मिळू देत नाहीत. त्यामुळे मराठ्यांना शकस्तिशाली बनवण्यासाठी ओबीसीतून आरक्षण दिल पाहिजे.

राजकारणतील दोन तीन दादांना मी घाबरत नाही, त्यामुळे माझ्या विरोधात टोळ्या उभ्या केल्या जातायेत. कोकनातील एक नेता सारखं वैर ठेवून असतात. माझ्या नदी लागू नका, असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. मराठवाड्यात आल्यावर बघून घेईन असं मी कधीच म्हटलं नाही तर तुम्ही जाणिवपूर्वक का वाद निर्माण करत आहात अशा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यांना मी मराठवाड्यात बोलावलेलं नाही आणि ते तर मला आता बघू शकत नाहीत. मी खूप शहाण्या तलामीतला नाही पण कोणाला घाबरत नाही, अशी तंबी त्यांनी दिली आहे.

..तर फडणवीसांना देखील पाडायचं!

मी अडाणी आहे चैथी नापास आहे पण कसं जमिनीवर आणलं. मंत्री छगन भुजबळ यांना माघावर पाठवलं पण आता १५ दिवस झाले कुठे गेले दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाला आले होते. छगन भुजबळ यांना जो नेता घेऊन फिरला त्या पक्षाचा नेता पाडायच. तसंच देवेंद्र फडणवीस भुजबळ यांना घेऊन फिरले तर त्यांना देखील पाडालयंच, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT