Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Fadnavis Convocation Ceremony: जपानकडून देवेंद्र फडणवीसांचा मोठा सन्मान; कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान

Devendra Fadnavis News : जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

Bharat Jadhav

Devendra Fadnavis Convocation Ceremony Programme:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील विद्यापीठाच्यावतीने गौरव करण्यात आलाय. जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.(Latest News)

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आला. कोयासन विद्यापीठाच्या १२० वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट प्राप्त करणारे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस पहिले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीस हे २०१५ मध्ये जपान दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉक्टरेट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जपानी भाषेत विद्यापीठाचा गौरवोद्गार काढले. मला अतिशय आनंद आहे, की मी दिक्षा भूमीच्या शहरातून येतो. कोयासन विद्यापीठाने मला डॉक्टरेट पदवीने जो बहुमान दिला आहे त्याबाबत मी मनापासून आभार मानतो. २०१५ साली जपानमधील विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित करता आला.

जपान आणि महाराष्ट्राची भारताची मैत्री वेगळी आहे. जपाने सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे. जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे. हा बॉन्ड केवळ मैत्रीचा नाही, तर सांस्कृतिक कडी आहे ती म्हणजे भगवान गौतम बुद्ध. ते दोन्ही देशाला जवळ आणतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT