जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर ६ दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. कुलगाममधील मोदरगाम आणि चिनिगाम गावात ही चकमक झाली. सहापैकी दोन मदरगाममध्ये तर ४ दहशदवाद्यांना चिनीगाममध्ये कंठस्नान घालण्यात आलं.
कुलगामच्या मोदरगाम येथील एका बागेत दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती आहे. चिनीगाम फ्रिसालमध्ये आणखी एक दहशतवादी लपल्याचा संशय आहे. सध्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली असतानाच हे ऑपरेशन सुरू आहे.
पहिली चकमक मोदरगाम गावात झाली. याठिकाणी पॅरा कमांडो लान्स नायक प्रदीप नैन कारवाईत शहीद झाले. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली आणि तीन दहशतवाद्यांना लपलेल्या ठिकाणी घेरलं. दुसरी चकमक फ्रिसल चिनिगाम गावात झाली. जेव्हा सुरक्षा दलांना या भागात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची माहिती मिळाली होती. याठिकाणी दहशदवाद्यांशी लढताना राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार राज कुमार शहीद झाले.
गावात पोहोचल्यावर एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दहशतादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिरधी यांनी चकमकीच्या ठिकाणांना भेट दिली आणि दहशतवादविरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. मागील महिन्यातच पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैयबाच्या पाकिस्तानस्थित द रेझिस्टन्स फ्रंटचे दोन टॉप कमांडर एका घरात अडकले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.