jamb , jalna, shri ram, police, shivsena saam tv
महाराष्ट्र

प्राचीन मूर्ती चाेरी प्रकरण : जांबेतील आंदाेलन चिघळलं; हिंदुत्वावाद्यांवर शिंदे सरकारची दपडशाही, सेना आक्रमक

शिवसेनेचे नेते शिवाजीराव चोथे आले आणि आंदोलन का धुडकावलं असा सवाल केला.

लक्ष्मण सोळुंके

Jamb Ram Mandir News : जालन्यातील (jalna) जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणी आठ दिवस झाले तरीही तपासात प्रगती हाेत नसल्याने ग्रामस्थांसह विविध संस्था, राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. आज घनसावंगी पोलीस (police) ठाण्यासमोर ठिय्या मांडण्याआधीच जांब समर्थ मधील नागरीकांना पोलिसांनी अडवलं. यावेळी शिवसेनेचे नेते शिवाजी चोथे आंदोलनावर (aandolan) ठाम राहिले. त्यामुळे काही काळ चोथे आणि पोलीस दला यांच्यात बाचा बाची झाली.

जालन्यातील जांब समर्थ येथील नागरिक आज राम मंदिरातील चोरीला गेलेल्या 7 प्राचीन मुर्ती पोलिसांनी तातडीनं शोधाव्या या मागणीसाठी घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार होते. मात्र हे नागरीक घनसावंगी शहरात येताच पोलिसांनी नागरीकांना अडवलं. त्यामुळे नागरीकांनी घनसावंगी शहरातील मुख्य रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केेलं हाेतं.

पोलिसांनी तातडीनं या प्रकरणी तपास सुरूच असल्याच सांगत आश्वासन दिल्यानं हे आंदोलनं स्थगित करण्यात आलं मात्र शिवसेनेचे नेते शिवाजी चोथे हे आंदोलनावर ठाम राहिले. त्यांनी घनसावंगी पोलीस ठाणे गाठून तेथे ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी चोथे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची देखील झाली. दरम्यान या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी चोथे यांनी केली.

माजी आमदार शिवाजीराव चोथे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवलं. पोलिसांना हफ्ते घेणारे सापडतात मात्र चोर कसा सापडत नाही असा सवाल चोथे यांनी उपस्थित केला.

दरम्यान यावेळी भूषण स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधताना आजचं आंदाेलन राम नामाचा गजर करीत केले. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणी जलद गतीने तपास केला जाईल असं आश्वासित केले आहे. त्यामुळे आजचं आमचं आंदाेलन हे स्थगित केलं आहे असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Toyota EV: टोयोटाची ऑल-इलेक्ट्रिक Urban Cruiser Ebella लाँच; 543 KM रेंज, 7 एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी बरंच काही, वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Live News Update: अकोल्यात भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर'

Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक, तरुणीच्या अंगावरून चाक गेले; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Horoscope: अमावस्येनंतर सुरू झालाय ५ राशींचा 'गोल्डन टाइम'; नशीब पालटणार, धनलाभासह करिअरमध्ये होणार प्रगती

SCROLL FOR NEXT