प्राचीन मूर्ती चाेरी प्रकरण; जांबला चूलबंद आंदाेलनास प्रारंभ, मुख्यमंत्र्यांनी स्वामींना दिलं 'हे' आश्वासन (पाहा व्हिडिओ)

याप्रकरणी तपास व्हावा आणि भाविकांची श्रद्धा असलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात यावा तसेच चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांसह भाविकांनी केली होती.
jamb, cm eknath shinde, ram, sita, laxman
jamb, cm eknath shinde, ram, sita, laxmansaam tv
Published On

Jamb Ram Mandir News : जालन्यातील (jalna) जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी स्वतः लक्ष घातले आहे. समर्थ रामदास स्वामींचे पूर्वज भूषण स्वामी यांच्याशी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी लवकरच चोरटे जेरबंद होतील अशी ग्वाही समर्थ रामदासांचे 11 वे वंशज भूषण स्वामी यांना दिली आहे. दरम्यान राम मंदीरातील चोरीला गेलेल्या मूर्ती शोधून चोरट्यांना गजाआड करण्याच्या मागणीसाठी जांब समर्थ मधील महिलांनी एक दिवसीय चुलबंद आंदोलन छेडलं आहे. त्यास नुकताच प्रारंभ झाला आहे.

जांब समर्थ येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीतेसह सहा पंचधातूंच्या प्राचीन मुर्त्यांची अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली. याप्रकरणी तपास व्हावा आणि भाविकांची श्रद्धा असलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात यावा तसेच चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांसह भाविकांनी केली होती. यासाठी अन्नत्याग आंदोलनही (aandolan) केले होते.

jamb, cm eknath shinde, ram, sita, laxman
Shivamurthy Muruga : लैंगिक शोषण प्रकरण; संत शिवमूर्ती मुरुगांना अटक, जामीन मंजूर

त्यानंतर साेमवारी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जांबसमर्थ येथे भेट दिली. स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी, स्थानिक पुजारी आणि ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोबाईल वरून संपर्क करून घटनेची तीव्रता लक्षात आणून दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषण स्वामींसोबत थेट संवाद साधत याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून लक्ष घातले जाईल असे सांगितले. मुंबईवरून तांत्रिक पथक पाठविले असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल आणि आरोपींना जेरबंद केले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

jamb, cm eknath shinde, ram, sita, laxman
Railway : रेल्वेच्या 58 गाड्या रद्द; विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेससाठी महत्वपुर्ण निर्णय (पाहा व्हिडिओ)

चुलबंद आंदाेलनास प्रारंभ

दरम्यान घटना घडून आठ दिवस झाले तरी मात्र अजूनही पोलिसांच्या हाती चोरीस गेलेल्या मूर्ती लागलेल्या नाहीत. त्यामुळे जांब समर्थ गावातील महिलांनी राम मंदिरात येऊन राम नामाचा जप सुरु करत गावात चुलबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत चोरीला गेलेल्या मूर्ती पोलीस शोधत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरूच राहील असा इशारा गावातील महिलांनी दिला आहे. दरम्यान आज सुरू करण्यात आलेलं चुलबंद आंदोलन एकदिवसीय आंदोलन असल्याची माहिती गावकऱ्यांनी (villagers) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com