Railway : रेल्वेच्या 58 गाड्या रद्द; विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेससाठी महत्वपुर्ण निर्णय (पाहा व्हिडिओ)

एकूण 58 रेल्वे गाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
Railway, Maharashtra Express, Vidharbha Express, Gondia
Railway, Maharashtra Express, Vidharbha Express, GondiaSaam tv

Trains Cancelled : मागील तीन महिन्यांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रुळावर आलेले नाही. त्यातच आता दक्षिण-पूर्व व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाइन आणि इंटर लॉकिंगच्या कामामुळे आजपासून (ता. 30 ऑगस्ट) पाच सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या नऊ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष बाब अशी पाच सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस (maharashtra express) ही नागपूरवरूनच (nagpur) सुटणार आहे. एकूण 58 रेल्वे गाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाइनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले असून यापुढील काम शिल्लक आहे. काचेवानीने तुमसर रोड व काचेवानी रेल्वे स्थानकापर्यंत थर्ड लाइन आणि इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे 22 नियमित आणि 36 साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Railway, Maharashtra Express, Vidharbha Express, Gondia
Shivamurthy Muruga : लैंगिक शोषण प्रकरण; संत शिवमूर्ती मुरुगांना अटक, जामीन मंजूर

5 सप्टेंबरपर्यंत रद्द असलेल्या गाड्यांमध्ये दुर्ग-गोंदिया स्पशेल व गोंदिया दुर्ग रायपूर, स्पेशल, गोंदिया- इतवारी, गोंदिया- इतवारी मेमू रायपूर इतवारी स्पेशल, इतवारी- रायपूर, कोरबा- इतवारी, इतवारी- बिलासपूर, इंटरसिटी, टाटानगर, शालिमार एक्स्प्रेस, अमृतसर- कोरबा एक्स्प्रेस, कोरबा-अमृतसर एक्स्प्रेस हावडा मेल, मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद, अहमदाबाद हावडा, आझाद हिंद एक्स्प्रेस, एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, सिंकदराबा दरायपूर- सिकंदराबाद, बिलासपूर भगत की कोठी, रिवा इतवारी, पुरी - गांधीधाम, गांधीधाम-पुरी, पोरबंदर या गाड्या रद्द राहणार आहेत.

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा आठ ते दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आधीच छत्तीसगढ़ मधील रायपुर- झारसुगड़ा विभागातील चौथ्या रेलवे मार्गाच्या विद्युत जोडणीसाठी 10 दिवस 34 रेल्वे गाड्या रद्द असतांना आता पुन्हा 58 रेल्वे गाड्या 5 सप्टेंबर पर्यंत रद्द झाल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप वाढला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Railway, Maharashtra Express, Vidharbha Express, Gondia
Passenger Train : बेळगाव, मिरज प्रवाशांसाठी खूषखबर; उद्यापासून धावणार तीन पॅसेंजर रेल्वे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com