saamtv
महाराष्ट्र

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Jalna Rajur Road Accident: जालना येथील राजूर रोडवर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय. ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय.

Bharat Jadhav

  • जालना-राजूर मार्गावर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक.

  • अपघातात रिक्षाचा चक्काचूर होऊन तिघांचा जागीच मृत्यू.

  • मृतांमध्ये बदनापूर तालुक्यातील मांडवा गावचे रहिवासी.

  • राजूर चौफुली परिसरात रविवारी सायंकाळी हा अपघात घडला.

अक्षय शिंदे-पाटील, साम प्रतिनिधी

जालना शहराबाहेर असलेल्या जालना राजुर मार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय. हा अपघात राजूर चौफुली परिसरात रविवारच्या सायंकाळी घडला. ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झालाय. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय.

गणेश बारसी, वय34 वर्ष, सुनिता वैद्य, 36 वर्ष, भरत होसे,33 वर्ष अशी अपघातात मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही जण बदनापूर तालुक्यातील मांडवा गावचे रहिवासी होते. राजूरच्या दिशेने येत असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षा जालना शहरातून आपल्या राजूर गावाकडे जात होती.

या घटनेमुळे मांडवा गावावर मोठी शोककाळा पसरली आहे. या तिघांचे मृतदेह पुढील उत्तर तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या अपघात प्रकरणी ट्रक चालका विरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

बाप लेकासह वयोवृद्ध आजीचा अपघातात मृत्यू

आज दुपारी पुण्यातील शिरुर तालुक्यात ट्रक आणि दूध गाडीचा अपघात झाला होता. यात वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बाप लेकासह वयोवृद्ध आजीचा अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दूध गाडीचा अपघात झाला. दूध गाडीने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. ज्ञानेश्वर वाजे,युवांश वाजे आणि शांताबाई वाजे असे अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत.

कसा झाला अपघात

अष्टविनायक महामार्गावर कवठे येथे रस्त्यावर ट्रक उभा असताना भरधाव वेगात आलेल्या दूध गाडीने ट्रकला अचानक धडक दिली. यावेळी दूधगाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेल्या बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर आजीला उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दूधगाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT