जालन्यात १५ वर्षीय तरुणीला तीन महिन्यांत सात वेळा सर्पदंश
सातव्या सर्पदंशानंतर खासगी रुग्णालयात उपचार
उपचारासाठी सुमारे पाच लाखांचा खर्च, कुटुंबावर कर्ज
या दुर्मिळ घटनेने जिल्हाभरात आश्चर्य व्यक्त
Jalna Ambad Girl Bitten By Snake Seven Times In Three Months जालन्यातून एक धक्कादायक आणि मन हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जालन्यातील कुक्कडगावातील एका पंधरा वर्षीय तरुणीला तब्बल तीन महिन्यात सात वेळा सर्पदंश झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणाने डॉक्टर सुद्धा चकित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही जालन्यातील अंबड तालुक्यातील कुक्कड गावात घडली आहे. या गावात राठोड कुटुंब राहतं. राठोड यांची १५ वर्षीय मुलगी पूजा कृष्णा राठोड ही सध्या नववीत शिकत आहे. पूजाला मागील तीन महिन्यात तब्बल सात वेळा सर्पदंश झाल्याची धक्कादायक आणि आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
सातव्या वेळेत सर्पदंश झालेल्या पूजावर जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. पूजाच्या वडिलांकडे केवळ एक एकर शेती असून ते शेतमजुरीचे काम करतात. मात्र मागील तीन महिन्यांमध्ये पूजाच्या उपचारासाठी जवळपास पाच लाख रुपये खर्च झाला आहे.
या खर्चामुळे पूजाच्या वडिलांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न तिच्या कुटुंबियांपुढे आहे. दरम्यान तीन महिन्यात एकाच मुलीला सात वेळेस सर्पदंश झाल्याने या घटनेबाबत जिल्हाभरामध्ये आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.