Gopichand Padalkar controversial remarks on Christian priests Saam TV News
महाराष्ट्र

BJP MLA: पादरीचा सैराट करेल त्याला लाख रूपये.. भाजप आमदाराच्या वादग्रस्त विधानानंतर ख्रिश्चन समाज आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

BJP MLA Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर जालन्यात ख्रिश्चन समाजाने आक्रोश मोर्चा काढला. धर्मांतरावर केलेल्या वक्तव्यामुळे पडळकर विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सतत वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्यांनी नुकतंच ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या विधानामुळे ख्रिश्चन समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात याचे पडसाद उमटले असून, सकल ख्रिश्चन समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गोपिचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे या मोर्चाला दलित संघटनांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, भावना दुखावलेल्या ख्रिश्चन बांधवांनी पडळकरांवर कारवाई झाली नाही, तर विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढू, असा थेट इशारा ख्रिश्चन समाजाने दिला.

पडळकरांचं वादग्रस्त विधान

सांगलीतील ऋतुजा प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन पादरीविरोधात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी म्हटलं, "आपल्याकडे जसे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवले जाते, तसेच धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीला ठोकण्यासाठी बक्षीस ठेवले पाहिजेत. पहिल्या पादरीला जो ठोकेल त्याला ५ लाख, दुसऱ्याला मारेल त्याला ४ लाख, तिसऱ्याला मारेल त्याला ३ लाख आणि जो कुणी पादरीचा सैराट करेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस दिले पाहिजे." या विधानामुळे ख्रिश्चन समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

सांगलीतील ऋतुजा प्रकरण

पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य सांगलीतील ऋतुजा प्रकरणावरून केलं. सांगलीमध्ये ऋतुजा नावाच्या गर्भवती महिलेला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तिच्या घरातील काही वस्तू जरी फुटल्या तरी, ख्रिश्चन पादरी तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या मंडळींना सांगत होते की, ऋतुजा हिंदू असल्यामुळे हे सर्व होत आहे. यानंतर ऋतुजा वर दबाव टाकला जात होता की, तिच्यावर गर्भसंस्कार हिंदू पद्धतीने न करता, ख्रिश्चन पद्धतीने केला जावा. याच मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी सवाल उपस्थित केला, "ही जबरदस्ती योग्य आहे का?" तसेच, "ख्रिश्चन पादरीवर गुन्हा का दाखल केला नाही?" त्यांनी असेही म्हटले की, "पादरी आमिष दाखवून लोकांचे धर्मांतर करतात, हे योग्य नाही. ऋतुजावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही". असं पडळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT