Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : पियुष गोयल यांच्या प्रतिमेचे जालन्यात पुजन; कापूस, शेतीमालाला भाव नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

Jalna News : केंद्र सरकारकडून भाव वाढीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गोयल यांच्या विरुद्ध आंदोलन केले आहे

लक्ष्मण सोळुंके

जालना : सरकारकडून कुठल्याच शेतीमालाचे भाव वाढत नसल्याने जालन्यातील दहीपुरी गावातील (Jalna) शेतकऱ्यांनी चक्क शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण ठरविणारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या प्रतिमेचे पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजन करुन आंदोलन केले. तसेच दक्षिणा व भीक मागून जमा केलेला १२ हजार रुपयांचा निधी पाठवला आहे. (Maharashtra News)

राज्यात गेल्या दीड वर्षापूर्वी फडदड (Cotton Price) कापसाला १४ हजार प्रति क्वींटल भाव होता. मात्र २०२२ नंतर या कापसाला फक्त साडेपाच हजार रुपये भाव मिळत आहे. सोयाबीन, तूर, मका, हरभरा या पिकांची देखील अशीच अवस्था असल्याने भाव वाढेल; या अपेक्षेने शेतकऱ्यांनी (Farmer) आपला शेती माल दाबून ठेवला आहे. मात्र केंद्र सरकारकडून भाव वाढीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गोयल यांच्या विरुद्ध आंदोलन केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोस्टाद्वारे पाठविला १२ हजाराचा निधी 

आंदोलन करताना शेतकऱ्यांनी कापसाला १२ हजार, तुरीला १४ हजार व सोयाबीनला १० हजार रुपये क्विंटल इतका भाव द्यावा; अन्यथा शेतकऱ्यांना मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांप्रमाणे गांजा, अफू लागवडीसाठी परवानगी द्यावी. शेतकरी विरोधी आयात -निर्यात धोरणांत बदल करा, अशी मागणी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करत केली. प्रतिमा पूजेदरम्यान जमा झालेली ७ हजार दक्षणा, भीक मागून जमा झालेले ५ हजार असे एकूण १२ हजार रूपये पोस्टाद्वारे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पोस्टाने पाठवण्यात आले आहे. तर मागण्या मान्य न झाल्यास पियुष गोयल यांच्या मुंबईतील बगल्या समोर उपोषण करण्याचा इशारा ही शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT