Beed Corona Update: बीड जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; ३ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Beed News : देशातील केरळ. बिहार, गोवा, महाराष्ट्र या राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत
Beed Corona Update
Beed Corona UpdateSaam tv

बीड : देशात कोरोना जे एन १ विषाणू आढळला असून आता बीड (Beed) जिल्ह्यात देखील कोरोना रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये बीड जिल्ह्यात तीन कोरोना (Corona) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

Beed Corona Update
Wardha Crime: मध्यरात्रीचा थरार.. फार्म हाऊसवर दरोडा; एकावर शस्त्राने वार करत दागिने व सोयाबीनची ५५ पोते नेले लुटून

कोरोना व्हायरसचा जेएन १ हा नवीन व्हेरिएंट (Corona New Varient) देशात झपाट्याने पसरत आहे. यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान (Corona Positive) देशातील केरळ. बिहार, गोवा, महाराष्ट्र या राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सांगली जिल्ह्यात रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता बीड जिल्ह्यात देखील ३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Corona Update
Bodwad News : लोखंडी क्रेन अंगावर पडून तरुणाचा मृत्यू; स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना घडली दुर्दैवी घटना

आरोग्य विभागाचे आवाहन 

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. दरम्यान जिल्हा रूग्णालय प्रशासन देखिल त्यासाठी सज्ज झाले असुन सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत, असे आवाहन बीड जिल्हा रूग्णालय प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर नागरीकांनी कोरोनाचे रूग्ण सापडले म्हणुन घाबरून जावू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन देखील यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com