Jalna Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Jalna Fraud Case : जालन्यात दोन कंपन्यांची व्यापऱ्यांकडून साडेतीन कोटीची फसवणूक

Jalna News जालन्यात दोन कंपन्यांची व्यापऱ्यांकडून साडेतीन कोटीची फसवणूक

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : शहरातील औद्योगिक वसाहतीत मेटारोल्स इस्पात कंपनीची एक कोटी ४१ लाख २१ हजार ४४६ रूपये तर (Jalna News) कालिका स्टील कंपनीची २ कोटी २९ लाख ५२ हजार १४१ रूपयांची अशी एकूण तीन कोटी ७० लाख ७३ हजार ५८७ रूपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर ही बाब समोर आली. (Live Marathi News)

जालन्यातील औद्योगिक वसाहतील मेटारोल्स इस्पात प्रा. लि. कंपनीतून २७ जानेवारी २०२१ ते ३० मार्च २०२२ या काळात संशयित सुधाकर शिवराम सुळकुडे, स्वप्निल सुधाकर सुळकुडे या कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी या १ कोटी ४१ लाख २१ हजार ४४६ रूपये किमतीच्या लोखंडी सळ्या खरेदी केल्या होत्या. काही दिवसांनंतर कंपनीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ केली. त्यानंतर कंपनीतील रामचंद्र ज्ञानेश्वर शिंगणे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा ठाण्यात दोन्ही व्यापाऱ्या विरुद्ध गुन्हा (Fraud) दाखल करण्यात आला आहे.

याचं व्यापाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीत असलेल्या कालिका स्टील कंपनीतूनही संशयित आरोपी व्यापारी सुधाकर सुळकुड, राहुल बागेवाडी, ज्योत्सना पवार यांनी संगनमत करून २ कोटी २९ लाख ५२ हजार १४१ रूपये किंमतीचा लोखंडी सळईचा माल खरेदी केला होता. परंतु, त्यांनी पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ केल्याने कंपनी प्रशासनाची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात प्रशासनाच्यावतीने चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर संसयित आरोपी यांना ताब्यात घेऊन न्यायालाय समोर हजर केले असताना न्यायाल्याने दोन्ही व्यापाऱ्यांना सोमवार प्रयन्त पोलिस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील या व्यापाऱ्यांनी अनेक स्टील कंपन्यांची फसवणूक केल्याचे धक्कादायक बाबी समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT