Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळच दरोडा; महिलेला मारहाण करत रोख रकमेसह दागिने लंपास

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात पोलीस अधीक्षक यांच्या निवस्थाजवळ आलेल्या माढा कॉलोनीतील अशोक लाड यांच्या घरावर (Jalna News) चोरट्याने दरोडा टाकल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात महिलेला मारहाण करत (Crime News) चोरट्यांनी रोख रकमेसह सोने– चांदीचे दागिने लांबविले आहेत. (Tajya Batmya)

जालना शहरातील माढा कॉलनीतील अशोक लाड यांच्या घरातील सर्व मंडळी गच्चीवर झोपलेले होते. घरात आपल्या मुलींसह झोपलेल्या सावित्रीबाई यांना भाडेकरू महिलेने आवाज दिल्याने त्या जाग्या झाल्या. त्यांनी दरवाजा उघडला असता दरवाजा बाहेर पाच ते सहा जण उभे असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या पाच ते सहा जणांनी दरवाजाला जोरदार धक्का देवून लाठ्या काठ्यांनी डोक्यावर आणि पायावर मारहाण करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.

गच्‍चीवरची मंडळी खाली आली तोवर..

घरातील एक लाख रुपये रोख रकमेसह अंगावरील व घरातील महालक्ष्मीच्या अंगावरील दागिन्यासह धूम ठोकली. सावित्रीबाई यांचा आवाज ऐकल्यानंतर गच्चीवर झोपलेल्या घरातील मंडळीने धाव घेऊन या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रोख रकमेसह दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT