Manoj Jarange Patil Holi Celebration Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: अंतरवाली सराटीत उत्साहाचं वातावरण; मनोज जरांगे पाटलांनी केली कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी

Rohini Gudaghe

लक्ष्मण सोळुंके साम टीव्ही, जालना

Manoj Jarange Holi Celebration Antarwali Sarati

मागील काही दिवसापासून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील चांगलेच चर्चेत आहेत. होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही होळी साजरी केली आहे. त्यांनी अंतरवाली गावात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला आहे.  (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांनी अंतरवाली सराटी गावात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी (Manoj Jarange Patil Holi Celebration) केली आहे. यावेळी उत्साहात कार्यकर्ते त्यांना रंग लावताना दिसून आले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये अतिशय उल्हासमय वातावरणात रंगपंचमी पार पडत आहे. जरांगेंना कार्यकर्त्यांनी रंग लावत होळी साजरी केली आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृतवाखाली २४ मार्च रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महाबैठक पार (Manoj Jarange Holi Celebration Antarwali Sarati) पडली. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आत द्यावं, असा मुद्दा त्यांनी या बैठकीत उपस्थित केला होता.

लोकसभा (Jalna News) निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करा. जोपर्यंत राज्य सरकार मराठा (Antarwali Sarati) समाजाला आरक्षण देत नाही. त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे व्हा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने प्रत्येक गावातून उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल. त्यामुळं आपापल्या गावात मराठा समाजाची बैठक घ्या. सर्व जाती धर्माचा मिळून जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित (Manoj Jarange) करा. त्यालाच अपक्ष निवडणूक लढवायला लावा. किंवा मग सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा द्या, असे दोन पर्याय जरांगे यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत.

राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देत नसेल, तर आता आरक्षण देणारे बना असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी (Maratha Aandolak) मराठा समाजाला केलं आहे. तीस तारखेपर्यंत कोण उमेदवार असणार, हे निश्चित करा असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT