Navneet Rana: होळीनिमित्त नवनीत राणांनी आदिवासी वाद्यांच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Navneet Rana Dance Video : यावेळी होळी सनानिमित्त्य करण्यात येणाऱ्या आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात नवनीत राणा सहभागी झाल्या आणि त्यांनी स्वतः आदिवासी कोरकू नृत्य केलं.
Navneet Rana
Navneet RanaSaam TV

Melghat :

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पर्वावर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पाच दिवस मेळघाटातील अनेक गावात जाऊन आदिवासींना होळीच्या शुभेच्छा देऊन होळी साजरी करत असतात. यंदा लोकसभेची निवडणूक असल्याने नवनीत राणा यांनी आपला प्रचार ही तिथूनच सुरू केला. होळीनिमित्त नवनीत राणांनी आदिवासी होळी नृत्य देखील केलं.

Navneet Rana
Melghat Tiger Reserve : सुवर्ण महोत्सवी वर्ष; मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ७२ वाघांचे वास्तव्य

नवनीत राणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्या भाजपच्या चिन्हावर लढतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशात काल आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणारं असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी होळी सनानिमित्त्य करण्यात येणाऱ्या आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात नवनीत राणा सहभागी झाल्या आणि त्यांनी स्वतः आदिवासी कोरकू नृत्य केलं. या पाच दिवसांच्या दौऱ्यात मेळघाटातील अनेक गावात त्या भेटी देऊन आदिवासींना होळीच्या शुभेच्छा देऊन होळी साजरी करत आहेत.

आदिवासींच्या गावात जाऊन आदिवासी भगिनीसोबत मुक्काम करणे आणि त्यांच्यासोबत वावरणे हे खासदार नसताना आणि आज खासदार असताना सुद्धा नवनित राणा करत आहेत.

नवनीत राणा या फार हौशी आहेत. भारतीतल सर्वच सण उत्सव त्या मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात. नवरात्री निमित्त त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा गरबा नृत्य केलंय. तसेच दहिहांडीच्या सणावेळी देखील त्यांचे डान्स करतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Navneet Rana
Kushal Badrike: 'बालपण मागे सुटत जातं, पण खोड्या...' कुशल बद्रिकेने शेअर केला होळी सेलिब्रेशनचा खास VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com