OBC Vs Maratha Jalna Wadigodri News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : जालन्यातील वडीगोद्रीत तुफान राडा, मध्यरात्री मराठा-ओबीसी आमने सामने; नेमकं काय घडलं?

OBC Vs Maratha Jalna Wadigodri News : जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मध्यरात्री तुफान राडा झाला. मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले.

Satish Daud

अक्षय शिंदे, साम टीव्ही

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. अशातच जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक जालन्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी वडीगोद्री फाट्यावर त्यांना पोलिसांनी अडवलं.

यावेळी काही ओबीसी बांधव देखील त्याठिकाणी आले. क्षणार्धात दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. वाद इतका विकोपाला गेला, की मराठा आणि ओबीसी बांधवांची बाचाबाची झाली. यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता असून कुठलाही अनूचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील भडकले

दरम्यान, वडीगोद्री येथील घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठ्यांच्या गाड्या अडवणारा जाधव कोण? त्याचा इथे काय संबंध? तो मराठ्यांना का त्रास देतोय? असे अनेक सवाल जरांगे यांनी उपस्थित केले. 13 महिने झाले मी संयमाने वागतोय. तुम्ही मराठ्यांची वाट अडवू नका. अन्यथा वडीगोद्रीत येऊन गेट उचलून फेकून देईल, असंही जरांगे म्हणाले.

वडीगोद्रीचे अन आमचे प्रेमाचे संबंध आहे तुम्हाला इथे काहीच माहिती नाही. दीड दिवस ड्युटी करून आलाय. तुला आऊट करून टाकेन, असं म्हणत एका पोलिसाच्या कृतीवर जरांगे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. एकाही मराठ्याच्या वाहनाला त्रास होता कामा नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आताच फोन लावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फे करा, अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे यांनी मध्यरात्री घेतले उपचार

दरम्यान, उपोषणामुळे प्रकृती खालावत असल्याने मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना शांत केले. तसेच त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. महायुती सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील जरांगेंसोबत मध्यरात्री फोनवर चर्चा केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांना सलाइन लावली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे अंतरवाली सराटी, वडीगोद्री येथे पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण डोंबिवलीतून ४० जण तडीपार; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT