मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात सभा होत आहे. राज्यभरातील लाखोंचा समुदाय या विराट सभेसाठी पोहोचला असून सभेतून जरांगे पाटील यांनी सरकारला १० दिवसांत आरक्षण जाहीर करण्याचा इशारा दिला. तसेच मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही थेट निशाणा साधला.
जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाणा....
अंतरवाली सराटीमधील विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केले आहे. जरांगे पाटील छगन भुजबळांवर थेट निशाणा साधत ठमी अजितदादांना विनंती करतो. छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही," असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
"छगन भुजबळ सात कोटी रुपयेच फक्त खर्च आला म्हणतात. सभेसाठी शेतकऱ्यांनी फुकट जमिनी दिल्या आहेत. स्वत:च्या गाड्या लावल्या. ज्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मोठं केलं, त्यांचेच रक्त पिऊन तुझ्यावर धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आला आणि हा आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले... अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भुजबळ, सदावर्तेंचे नाव घेत इशारा...
"छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि गुणरत्न सदावर्ते यांचे नाव घेत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या मालकांनी आता हे सांगितलं आहे का? १०६ आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का?" असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना "उपमुख्यमंत्र्यांनी असले येडपाट पाळलेत कशाला? मोदी साहेब फडणवीसांना समज द्या, कार्यकर्ते (सदावर्ते) अंगावर घालू नका असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ आणि सदावर्तेंना मराठ्यांना उकसवण्यास सांगितले आहे. असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.