Jalna Police Saam tv
महाराष्ट्र

Jalna Police : अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री; चंदनझिरा पोलिसांची छापा टाकत दोन दुकानांवर कारवाई

Jalna News : जालना शहरातील नवीन मोंढा भागातील खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या दोन दुकानांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: अवैध पद्धतीने गुटख्याची वाहतूक व विक्री अगदी सर्रासपणे सुरूच आहे. त्यानुसार जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून सदरच्या कारवाईत ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

आजही अनेकठिकाणी अवैधपणे गुटखा वाहतूक व विक्री करण्यात येत असते. त्यानुसारच जालना शहरातील नवीन मोंढा भागातील खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या दोन दुकानांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस पथकाने नवीन मोंढा येथील दुकानांवर छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे. 

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जालन्यात मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील नविन मोंढा परिसरामध्ये चंदनझीरा पोलिसांनी ही कारवाई केली असून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ
जालना शहरात मोठ्या प्रमाणात पान मटेरियलच्या नावाखाली प्रतिबंधित सुंगधित जर्दा विक्री करुन मानवांना नशेच्या आहारी ढकलणार्‍या जर्दा माफीयावर चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी डीवायएसपी करिष्मा चौधरी यांनी आपल्या पथकासह नवीन मोंढा भागातील गोदामावर छापे मारले. या छाप्यामुळे जर्दा माफीयात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT