Jalna Fire News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Fire News : गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने घराला आग; आगीत अन्नधान्यासह साडेचार लाखाचे नुकसान 

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

जालना : शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबाच्या घरी सकाळी स्वयंपाक सुरु असताना गॅसचा भडका उडाला. या आगीत घर संपूर्णपणे जाळून खाक झाले असून घरातील अन्न धान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. 

जालना (Jalna) जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील पळसखेडा ठोंबरे येथे शेतात वास्तव्य असलेल्या एका घरात सकाळी स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसचा भडका उडाला. गॅसचा भडका उडताच घरातील महिलांनी घाबरून बाहेर येत आरडा ओरड केली. यामुळे आसपासचे नागरिक मदतीला धावले. मात्र, तोपर्यंत गॅसचा स्फोट होऊन संपूर्ण घराला (Fire) आगीने वेढले होते. मात्र नागरिकांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.  

साडेचार लाखाचे नुकसान 

आगीमध्ये घरातील मोटार सायकल, चाळीस हजार रुपये रोख रक्कम, ज्वारी, बाजरी, शेतातील तुषार संच यासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या शेतकऱ्याचे (Farmer) सुमारें साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कुटुंबातील व्यक्ती करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT