Jalna News Ghanewadi Dam
Jalna News Ghanewadi Dam Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: घाणेवाडी जलाशयात केवळ ११ टक्केच पाणीसाठा; जालन्यात उद्‌भवणार पाणीटंचाईच्या झळा

लक्ष्मण सोळुंके

जालना : २०१४ च्या भीषण दुष्काळानंतर पुन्हा एकदा जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांना पाणी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. (Jalna News) जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पाची पाणीपातळी ही ज्योत्याखाली गेली आहे. तर १९ प्रकल्पामध्ये केवळ २१ टक्‍केच पाणी साठा शिल्लक राहिल्याने जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना मे अखेरीस आणि जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविले जात आहे. (Latest Marathi News)

जालना नगरपरिषदेची महानगरपालिकेमध्ये रूपांतर होणार असल्याची घोषणा नुकताच करण्यात आली आहे. मात्र शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या (Jayakwadi Dam) जायकवाडी पाणीपुरवठा योजना ही हत्ती पोसणारी योजना म्हणून पालिकेची नवी ओळख निर्माण झाली आहे.

२०१४ च्या भीषण दुष्काळानंतर जालना शहरासह परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने महत्त्वाकांक्षी अशी जायकवाडी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र ही योजना राबवूनही पाणी जालन्याचा एसीपर्यंत आलं. मात्र नळापर्यंत पोहोचू न शकल्याने नागरिकांना मार्च आणि मे महिन्यातही तब्बल एक– एक महिना नळाच्या पाण्यासाठी वाट बघावी लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारी ही योजना पालिकेसाठी हत्ती पोसणारी योजना ठरवू लागली आहे.

मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन

निम्म्या जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या (Ghanewadi) घाणेवाडी जलाशयातही केवळ अकरा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच उन्हाचा झळा तीव्र झाल्याने जलाशयात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी पातळीतील मोठी घट झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील ६४ प्रकल्पापैकी २६ प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होऊन हे प्रकल्प ज्योत्याखाली गेले आहेत. तर १९ प्रकल्पामध्ये फक्त २१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून जून महिन्यापर्यंत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असून येणाऱ्या काही काळात मोठ्या प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जायकवाडी पाणीपुरवठा योजना सारखी महत्त्वाकांक्षा योजना राबवूनही पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि नियोजना अभावी ही योजना नगरपरिषदेला सांभाळणेही कठीण झाले आहे. त्यातच नगरपरिषदेचे रूपांतर केले जाणार असल्याने पाण्यावरून राजकारण ही तापू लागले आहे. सत्तेत नसताना जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून जल आक्रोश मोर्चा काढणारे देवेंद्र फडणवीस आता राज्यात उपमुख्यमंत्री आहेत. ते तरी आता पाणी प्रश्न सोडवतील का? असा प्रश्न अत्ता विरोधक उपस्तित करत आहेत. त्याचाच या राजकारनाचा मोठा फटका आता नागरिकांना बसताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT