Jalna News 
महाराष्ट्र

Jalna: झोपेतच ५ जणांवर काळाचा घाला, वाळूचा टिप्परने घेतला जीव, जालन्यात खळबळ

Jalna News : पत्र्याच्या शेड शेजारी वाळू खाली करण्यात आली, त्यामुळे गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू झालाय. जालन्यातील पासोडी येथील घटना, घटनेने जिल्हाभरात हळहळ...

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील

Jalna Latest News : जालन्यात दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री गाढ झोपेत असणाऱ्या पाच मुजरावर काळाने घाला घातलाय. वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेड शेजारी खाली केल्याने वाळू खाली गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथून समोर आली आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ("Five Laborers Crushed to Death by Sand Dumper in Jalna While Sleeping in Shed")

दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रोडवर पुलाचे काम चालू होते या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे गुत्तेदाराकडे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते. रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते, एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते.

दरम्यान या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला. त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू पलटी केली. यामुळे शेडमध्ये झोपलेल्या पाच जणांचा दबून मृत्यू झाला. गणेश काशिनाथ धनवई (वय ४० रा.गोळेगाव) भूषण गणेश धनवई,(वय १६ रा गोळेगाव) सुनील समाधान सपकाळ (वय २० रा. पद्मावती)यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्या मधे समावेश आहे.

बाप लेकांचा मृत्यू

सकाळी झोपेत असताना गणेश धनवई आणि भूषण धनवई या बापलेकांवर काळाने घाला घातला विशेष म्हणजे थंडी असल्याने मयतांच्या अंगावर रग होती त्यावर रेतीच्या जोराने पत्र्याचे शेड पडले व पत्र्यावर रेती पडली यामुळे सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये एक तेरा वर्षी मुलगी ही दबल्या गेली होती परंतु गावातील ग्रामस्थांसह शेजारी राहणाऱ्या मजुरांनी मदत करून मुलीचे प्राण वाचवले.

घटनास्थळी महिलांचा आक्रोश

जालन्यातील पासोडी येथे पत्र्याच्या शेड शेजारी वाळूचे टिप्पर खाली केल्याने पाच जणांचा रेतीखाली दबून मृत्यू झाल्याने घटनास्थळी सकाळीच महिलांचा आक्रोश दिसून आला. मयतांचे नातेवाईक सकाळीच घटनास्थळी आली यामध्ये महिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT