Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: उपोषणदरम्‍यान महिलेचा मृत्यू; चाळीस दिवसांपासून सुरू होते उपोषण

उपोषणदरम्‍यान महिलेचा मृत्यू; चाळीस दिवसांपासून सुरू होते उपोषण

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चाळीस दिवसांपासून उपोषणाला बसलेल्‍या माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा मृत्यु (Death) झाला. यामुळे जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. (Letest Marathi News)

कस्तुराबाई बळवंत गायकवाड असे वृद्ध मृत्यु पावलेल्या (Jalna News) माजी सैनिकांच्या पत्नीचे नाव आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्राचार्या यांनी शासनाकडून माजी सैनिकास मिळालेल्या जागेवर अतिक्रमण केले आहे. जालना- औरंगाबाद (Aurangabad) महामार्गावरील सर्वे नंबर 49/38 या जमिनीचा वाद सुरू आहे. वादामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य यांना वाद असलेल्या जमिनीवर जाण्यास कोर्टाने मनाई केली असतानाही प्राचार्य आपल्या दोन शिक्षकांसह वाद असलेल्या जमिनीवर येऊन त्यांनी गायकवाड यांच्या सुनेसह नातीस छेडछाड करून शिविगाळ केली केला असल्याचा आरोप माजी सैनिकांच्या कुटूंबानी करत कारवाईच्या मागणीसाठी गायकवाड कुटूंबाकडून उपोषण सुरू होते.

प्राचार्या विरोधात गुन्‍हा दाखलची मागणी

प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या दरम्यान कस्‍तुराबाई गायकवाड या महिलेचा आज मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून महिलेल्‍या कुटुंबातील सदस्यांकडून प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT