Farmer Cotton Price
Farmer Cotton PriceSaam tv

Nandurbar News: सीसीआयकडून कापसाचे दर कमी; खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको

सीसीआयकडून कापसाचे दर कमी; खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको
Published on

सागर निकवाडे

नंदुरबार : सीसीआयने कापसाचे खरेदी दर कमी केले. यामुळे शेतकरी संतप्‍त झाला असून नंदुरबार (Nandurbar) येथील केंद्रावर कापसाची खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. नंदुरबार तालुक्यातील पळाशी कापुस (Cotton) खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांचा रस्ता रोको करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Farmer Cotton Price
Aurangabad News: खर्चासाठी पैसे नाही, म्हणून फार्मसीच्या विद्यार्थ्याचे कारनामे; अखेर पोलिसांच्‍या ताब्‍यात

गतवर्षी कापसाला (Cotton Price) बारा हजार प्रतिक्‍वींटलपर्यंत भाव मिळाला होता. यामुळे यंदा देखील दहा हजाराच्‍यावर भाव मिळेल; अशी अपेक्षा बळीराजाला (Farmer) होती. मात्र मागील महिना– दीड महिन्‍यापासून कापसाचे दर स्‍थीर आहेत. उलट दर कमी होत आहेत. यात शुक्रवारी सीसीआयची कापुस खेरदी बंद झाल्यानंतर आज सोमवारी खरेदी सुरु झाल्यानंतर तब्बल हजार ते बाराशे रुपयांनी कापसाचा भाव पडला. त्यामुळेच शेतकऱी चांगलेच संतप्त झाले.

शेतकरी महामार्गावर ठाण मांडुन

कापसाचे दर कमी झाल्‍याने संतप्‍त बळीराजाने कापूस खरेदी बंद पाडली. याशिवाय रास्‍ता रोको आंदोलन केले. तासाभरापासुन शेतकरी शेवाळी नेंत्रग महामार्गावर ठाण मांडुन आहेत. यामुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या अंतरावर रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com