अक्षय शिंदे
जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रभाग रचना आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या तयार करण्यात आलेल्या प्रभाग निहाय मतदार याद्यामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत असून अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभाग ऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांची तयारी सुरु आहे. यात जवळपास सर्वच पालिकांकडून प्रभाग रचना तयार करत यावर आलेल्या हरकती दूर करून अंतिम प्रभाग रचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जालन्यातील भोकरदन नगर परिषदची प्रारूप मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ समोर आला असून आतापर्यंत 650 पेक्षा अधिक मतदारांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहे.
अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागात
अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभाग ऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहे. भोकरदन नगरपरिषदेचा प्रारूप मतदार यादीमध्ये ही माहिती समोर आली असून आतापर्यंत ६५० पेक्षा अधिक मतदारांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान ही चूक नगरपरिषद प्रशासनाची नसून याला संबंधित बीएलओ जबाबदार आहे. ज्या नागरिकांची नावे त्यांच्या प्रभागा व्यतिरिक्त नोंदवली आहेत. त्यांच्या तक्रारी बघून घटनास्थळी जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल; अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.
गोंधळाबाबत नगरपालिका आणि तहसील प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
भोकरदन नगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरातील मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांची नावे त्यांच्या रहिवासी प्रभागा ऐवजी दुसऱ्या प्रभागात आल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गोंधळाविरोधात आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक मतदारांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या गंभीर चुकीसाठी नगरपरिषद आणि तहसील प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.