Jalna Maratha Andolan News Saam TV
महाराष्ट्र

Jalna News: जालन्यात मराठा समाज आक्रमक; अंबड तालुक्यात एसटी महामंडळाची बस पेटवली, थरारक VIDEO समोर

Maratha Andoln Latest News: मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात आंदोलकांनी बस पेटवली आहे.

Satish Daud

Jalna Maratha Andolan Manoj Jarange Patil

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना (Maratha Reservation) मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचाबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत. (Latest Marathi News)

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यास ठाम असून सध्या ते भांबेरी गावात आहेत. त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमा होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरांगेंच्या सहकाऱ्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी तर, बाळासाहेब इंगळे घनसावंगी येथील रहिवासी आहेत. दोघेही जरांगेंचे (Manoj Jarange Patil) कट्टर समर्थक असून ते आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्यासोबत आहेत. मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिल्यानंतर दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयारी करीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT