Weather Update: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार; मराठवाडा विदर्भातील 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून भारतीय हवामान खात्याने विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather ForecastSaam TV
Published On

IMD Rain Alert in Marathwada Vidarbha

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातून थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. परिणामी काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Weather Forecast
Breaking News: जालन्यात भल्यापहाटे पोलीस धडकले; मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक ताब्यात, परिसरात मोठी खळबळ

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून भारतीय हवामान खात्याने विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. सोमवार २६ आणि मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी (Rain Alert) कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

इतकंच नाही, तर काही जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसणार, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. ऐन रबी हंगामाची पिके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट आल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

दुसरीकडे, खासगी हवामान संस्था स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसेल. पुढील २४ तासांत सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast
Accident News: भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीसह ट्रकला धडक; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com