Jalna Crime Saam TV
महाराष्ट्र

Jalna Crime : 20 हजारांची लाच घेताना उपविभागीय भूसंपादन अधिकारी रंगेहाथ पकडला

या अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे 30 हजारांची लाच मागितली होती.

लक्ष्मण सोळुंके

जालना: 20 हजाराची लाच स्वीकारताना अंबड शहरातील उपविभागीय भूसंपादन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं तलावात गेलेल्या जमिनी शेजारी असलेल्या जमिनीचा सुधारित भूसंपादन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यासाठी या अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे 30 हजारांची लाच मागितली होती. (Jalna Crime News)

भगवान विठ्ठल राऊत असं अटक केलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याच नाव आहे. घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी गावातील तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा सुधारित अहवाल पाठवण्यासाठी राऊत यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे 30 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना ही लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. (jalna Todays News)

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अंबड शहरातील उपविभागीय कार्यालयात सापळा रचून 20 हजाराची लाच घेताना राऊत यांना अटक केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली, हजारोंचा सहभाग

Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

SCROLL FOR NEXT