Jalna Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Crime: धक्कादायक! प्रेमसंबंधांचा संशय, सख्ख्या भावांनी काढला तरुणाचा काटा; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

Jalna Youth Killed Case Update: जालन्यामध्ये तरुणाची हत्या करून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. या हत्या प्रकरणाचा ३ दिवसांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. सख्ख्या भावांनी तरुणाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

जालन्यामध्ये २२ वर्षीय तरुणाचा जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला होता. या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सख्ख्या भावांनी या तरुणाची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरून या तरुणाची हत्या करण्यात आली. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावामध्ये ३ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी भावाचा मृतदेह जाळून टाकला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुना या गावात ३ दिवसांपूर्वी एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका गायरान जमिनीत आढळून आला होता. हा तरुण कोण आहे याचा तपास पोलिस करत होते. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येच्या तिसऱ्या दिवशी या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

दोन सख्ख्या भावांनीच आकाश जाधव याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. याप्रकरणी बालाजी मिसाळ आणि गणेश मिसाळ या २ सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली. बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या संशयावरून या दोन सख्ख्या भावांनी आकाशला रात्री बोलावून घेतले आणि त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या दुचाकीतील पेट्रोल काढून त्याचा मृतदेह जाळून टाकला.

आकाशचा मृतेदह जाळून टाकल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही हत्या असल्याचे कळताच जालना पोलिसांनी तपासाची सर्व चक्रे फिरवली. पोलिसांनी जलद गतीने तपास करत आकाळच्या मारेकऱ्यांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे. आकशच्या कुटुंबीयांना यामुळे मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT