Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : वर्ग शिक्षकाने काढली विद्यार्थिनीची छेड; ग्रामस्थांनी दिला चोप, जालन्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Jalna News : वर्ग शिक्षकाने मुलीची छेडछाड केल्याची घटना घडल्यानंतर मुलीने घरी सांगितले. यानंतर शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी नराधम शिक्षकाला चोप देत शिक्षकाला मौजपुरी पोलिसांच्या हवाली केले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: शाळेत जाणाऱ्या मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. मुलींची छेडछाड करणे व अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असुंन जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तिच्याच वर्ग शिक्षकाकडून छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात समोर आली आहे. यात संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

जालना जिल्ह्यातील शेवगा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हि धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना राज्यात चांगलीच गाजत आहे. या घटनेनंतर राज्यातील सर्वच शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर जालना जिल्ह्यात चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढण्याची घटना समोर आली आहे. 

ग्रामस्थांनी शिक्षकाला दिला चोप 

वर्ग शिक्षकाने मुलीची छेडछाड केल्याची घटना घडल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत मुलीने घरी सांगितले. यानंतर शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला. यानंतर शिक्षकाला मौजपुरी पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान सध्या या प्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

राज्यात बदलापूर येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. बदलापूरच्या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशानुसार सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसलेले नाहीत. यानंतर जालना जिल्ह्यात चिमुकलीचे छेडछाड झाल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT