Sand Mafia : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दोघांना उडवण्याचा प्रयत्न; एकजण जखमी, ग्रामस्थ झाले आक्रमक

Buldhana News : खडकपूर्णा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करण्यात येतो. यात इसरुळ गावातून वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने रात्रीच्या सुमारास वाळूच्या भरधाव डंपरने गावातील एका तरुणाला उडविले. यात तरुण जखमी झाला
Sand Mafia
Sand MafiaSaam tv
Published On

बुलढाणा : अवैध वाळू वाहतूक हा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. कारवाई झाल्यानंतर थोडे दिवस शांतता राहिल्यानंतर पुन्हा वाळूची वाहतूक सुरु होत असते. अशाच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने तरुणाला उडविले. यामुळे ग्रामस्थांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने एकाला चिरडण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करण्यात येत असतो. यात इसरुळ गावातून वाळूची वाहतूक करणारे डंपर जात असतात. दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने काल रात्रीच्या सुमारास अवैध वाळूच्या भरधाव डंपरने गावातील एका तरुणाला उडविले. यात तरुण जखमी झाला. या घटनेनंतर देखील डंपर चालक भरधाव वेगाने गावातून निघून गेला. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले. 

Sand Mafia
Pune News: पुण्यात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच, पुन्हा ६० ते ७० गाड्या फोडल्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढच्या गावात ग्रामस्थांच्या अंगावर घातला डंपर  

ग्रामस्थांनी त्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. यानंतर ग्रामस्थांनी सदर घटनेबाबत पुढच्या गावातील नागरिकांना माहिती दिली. यानंतर पुढच्या गावात देखील नागरिकांनी डंपर अडवण्याचा प्रयत्न केला असता येथील ही ग्रामस्थांचे अंगावर चालकाने डंपर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याठिकाणी कुणालाही लागले नाही. यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि संपूर्ण वाळू वाहतूक बंद केली. 

Sand Mafia
Tuljabhavani Mandir : मठाच्या जमिनीवरून तुळजाभवानी संस्थान, पुजाऱ्यांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह; सोलर प्रकल्पातून येणारा मोबदला मठाला देण्यास विरोध

वाळू वाहतूक बंद करण्याचे आश्वासन 

दरम्यान आक्रमक ग्रामस्थांनी येथून होणारी वाळू वाहतूक करणारे डंपर अडवून धरले होते. गावात निर्माण झालेल्या गोंधळाने महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी वाळू वाहतूक थांबविण्याची मागणी केली. मात्र ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून महसूल प्रशासनाने संपूर्ण वाळू वाहतूक बंद करण्याचे आश्वासन दिल्याने वाद मिटला. मात्र अवैध वाळू बंद कधी होणार, हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com