Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : नवरदेवाच्या बहिणीसोबत घडले भयंकर; जेवणाच्या हॉलमध्ये जाताच मुलींनी साधला डाव, लग्न मंडपात खळबळ

Jalna News : हॉलमध्ये गेल्यावर यावेळी नवरदेवाच्या बहिणीची पर्स चोरीला गेली. यामध्ये दागिने, फोन आणि काही रोख स्वरूपात रक्कम होती. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच गोंधळ उडाला होता

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: विवाह समारंभात दोन्हीकडील मंडळी लग्नाच्या गडबडीत असतात. यातच नवरदेवाची बहीण तयारी करण्यात आणि धावपळीत असते. मात्र लग्न सोहळ्याच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी नवरदेवाची बहीण जाताच येथे आलेल्या मुली त्यांच्यावर लक्ष घेऊन होत्या. मुलाला घेऊन खुर्चीवर बसताच गर्दीत घुसून मुलींनी संधी साधली आणि नवरदेवाच्या बहिणीची पर्स घेऊन पसार झाल्या. हा प्रकार लक्षात येताच लग्न मंडपात प्रचंड गोंधळ उडाला होता. 

जालना शहरातील अंकुशनगर येथील एका मंगल कार्यालयात डॉ. शुभांगी झिंजुर्डे आणि डॉ. विजयकुमार जरांगे यांचा विवाह पार पडत होता. या दरम्यान नवरदेवाची बहीण तिच्या मुलाला जेवण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये घेऊन गेली. हॉलमध्ये गेल्यावर यावेळी नवरदेवाच्या बहिणीची पर्स चोरीला गेली. यामध्ये दागिने, फोन आणि काही रोख स्वरूपात रक्कम होती. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच गोंधळ उडाला होता.

लग्न मंडपात गोंधळ 

दरम्यान अश्विनी जरांगे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पर्समध्ये असलेले ५ तोळे सोने, ५५ ग्रॅम चांदी, ४५ हजार रुपये रोख रक्कम, आयफोन आणि एक सॅमसंग असा पर्समधील मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. रात्री उशिरा पर्यंत तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्न मंडपात प्रचंड गोंधळ उडाला होता. सर्वत्र शोधाशोध सुरु होती. 

पोलिसांकडून शोध सुरु 
चोरीला गेलेल्या पर्समध्ये नवरीचे व तिच्या बहिणीचे सोन्याचे दागिने तसेच दोन आयफोन आणि ५० हजार रोख ठेवलेले होते. सदरील पर्स लग्नात आलेल्या अज्ञात मुलींनी लंपास केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून गोंदी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT