Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : जमिनीचा वाद टोकाला; मामा आणि मावस भावाने मिळून केली भाच्याची हत्या

Jalna News : परमेश्वर लोखंडे यांचा अनिल कांबळे व अर्जुन रामफळे यांच्यासोबत जमिनीवरून वाद होता. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने शाब्दिक वादातून निर्माण झालेला वाद टोकाला गेला

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: शेत जमिनीच्या वादातून भावकीत नेहमीच वाद पाहण्यास मिळत असतात. या वादातून प्राणघातक हल्ला केला जात असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशाच एका घटनेने जालना जिल्हा हादरला असून या घटनेत जमिनीच्या वादातून मामा आणि मावस भावाने मिळून भाच्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. 

जालन्यातील भोकरदन शहराजवळील डावरगाव फाट्याजवळ ही घटना घडली आहे. परमेश्वर लोखंडे असं घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव असून प्रॉपर्टी आणि जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती आहे. दरम्यान परमेश्वर लोखंडे यांचा अनिल कांबळे व अर्जुन रामफळे यांच्यासोबत जमिनीवरून वाद होता. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने शाब्दिक वादातून निर्माण झालेला वाद टोकाला गेला. यात परमेश्वर यास दोघांनी मिळून बेदम मारहाण केली.  

मृतदेह फेकला रस्त्याच्या बाजूला 

लोखंडी रॉड व काठीने मारहाण केल्याने परमेश्वर लोखंडे याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यामुळे मारहाणीत हत्या झाल्याचा संशय येऊ नये तसेच पोलिसांचा तपास भरकटण्यासाठी आरोपींनी परमेश्वर याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला होता. मात्र गावकऱ्यांना मृतदेह दिसून आल्याने घटना उघडकीस आली. यानंतर घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. 

अवघ्या दोन तासात आरोपी ताब्यात 

घटना समजल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करत घटनेचा तपास सुरु केला होता. दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मारेकरीचं तपास लावत अवघ्या दोन तासांमध्ये संशयित आरोपी अनिल कांबळे आणि अर्जुन रामफळे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Hair Care: रात्री झोपताना केस मोकळे ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

मेडिकल स्टूडेंट गर्लफ्रेंडसोबत OYOमध्ये गेला, गोळ्या खाल्ल्या अन्.. संशयास्पद मृत्यूमागचं गूढ वाढलं

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकार काळाच्या पडद्याआड; संगीतविश्वावर शोककळा

Bihar Election : इंडिया आघाडीत पहिली मोठी ठिणगी पडली; आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने

स्पेसमध्ये कसा तयार होतो ब्लॅक होल?

SCROLL FOR NEXT