Brother kills elder brother with axe in Jalna Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

Jalna Crime: वहिनीसोबत अनैतिक संबंध, सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने डोक्यात वार करत गळा आवळून केली हत्या, हत्येनंतर मृतदेह तलावात दिला फेकून दिला.. जालन्यातील सोमठाणा येथील घटना, संशयित आरोपी पत्नी आणि भावाला पोलिसांकडून अटक

Namdeo Kumbhar

  • अनैतिक संबंधांमुळे लहान भावाने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला.

  • वहिनीच्या मदतीने गळा आवळून हत्या करून मृतदेह गोणीत भरला.

  • मृतदेहावर दगड बांधून दुचाकीवरून नेऊन तलावात फेकून दिला.

  • पोलिसांनी दोन्ही आरोपी – पत्नी आणि लहान भाऊ – यांना अटक करून तपास सुरू केला आहे.

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Brother kills elder brother with axe in Jalna : जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या मोठ्या भावाची लहान भावाने कुऱ्हाडीने डोक्यात करत गळा आवळून हत्या केलीय. परमेश्वर राम तायडे अस मयताच नाव आहे. जालन्यातील सोमठाणा परिसरात ही घटना घडली असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मयताची पत्नी आणि लहान भावाचे अनैतिक प्रेम संबंध होते. वहिनीसोबतच्या अनैतिक प्रेमसंबंधात सख्ख्या भाऊ अडथळा ठरत असल्याने लहान भावाने वहिनीच्या मदतीने कुऱ्हाडीने डोक्यात वार करत गळा आवळून मोठ्या भावाची हत्या केलीय. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून दगड बांधून तलावात फेकून दिल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुण बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयताचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे आणि मयताची पत्नी मनिषा परमेश्वर तायडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेम प्रकरणातून भावजयीच्या मदतीने केला भावाचा खून

प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने भावजयीच्या मदतीने भावाने भावावर कुऱ्हाडीने वार करून खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरला त्यात दगड टाकून तो मृतदेह दुचाकीवर नेऊन तलावातील पाण्यात फेकण्यात आला. ही घटना बदनापूर तालुक्यातील वाला सोमठाणा तलावात उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

संशयित आरोपी भावासह पत्नीला पोलिसांकडून अटक

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने भावाने भावाचा खून केल्यानंतर मृतदेह सोमठाणा तलावात फेकून दिला.12 नोव्हेंबर रोजी एका पोत्यात एक मृतदेह पाण्याबाहेर आला. यावेळी पोलिसांनी आणि नागरिकांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला .चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली होती. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि भावाने भावजयीच्या मदतीने खून केल्याचं पुढं आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: १० वाजेपर्यंतच्या कलानुसार JDU सर्वात मोठा पक्ष; ७६ जागांवर आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

SCROLL FOR NEXT