Jalna Steel Company Blast News:  Saamtv
महाराष्ट्र

Jalna MIDC Blast News: ब्रेकिंग! जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट, २० कामगार जखमी; ३ गंभीर

Jalna Steel Company Blast News: स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडून २० जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना. ता. २४ ऑगस्ट २०२४

जालन्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडून २० जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्टील कंपनीत भीषण स्फोट!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड कामगारांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस अधिक्षकांनी दिली माहिती!

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, बचाव पथकाने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेत २० कामगार जखमी झाले असून यांपैकी ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळासह, रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून जबाब नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shinde Vs Dighe: ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

MVA CM Face: मविआचा मुख्यमंत्री कोण? संजय राऊतांकडून वेळ, तारीख जाहीर

तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?

Nashik Politics : नाशिकमध्ये 'सांगली' पॅटर्न; काँग्रेसचे २ इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम? नेमकं काय राजकारण शिजतंय?

Terror Attack: तुर्की दहशतवादी हल्ल्याने हादरलं; १० जणांचा मृत्यू, अनेकांना ठेवलंय ओलीस

SCROLL FOR NEXT