Nepal Bus Accident : नेपाळहून मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी वायुसेनेचं विमान पाठवणार, बस अपघातात २७ जणांचा मृत्यू

Nepal Bus Accident : नेपाळमधील अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या संवाद साधला आहे. मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचं विमान पाठवण्यात येणार आहे.
Nepal Bus Accident
Nepal Bus AccidentSaam Digital
Published On

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहेत.

Nepal Bus Accident
Nepal Bus Accident : नेपाळच्या बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचंही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.

Nepal Bus Accident
Nepal Bus Accident: भुसावळवर शोककळा! ४० पर्यटकांची बस नदीत कोसळली, १६ जणांना जलसमाधी, प्रवाशांची यादी समोर

नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे. महामार्गावरून जाणारी बस नियंत्रणाबाहेर जाऊन मर्स्यांगडी नदीत पडल्याने हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी २४ मृतदेहांची ओळख पटली असून ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. आता हे सर्व मृतदेह शनिवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाने महाराष्ट्रात नेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानेही याला दुजोरा दिला आहे.

Nepal Bus Accident
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' गुदमरली, नंदुरबारमध्ये बँकेत महिलांची चेंगराचेंगरी, दोन महिला बेशुद्ध

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com