Nepal Bus Accident: भुसावळवर शोककळा! ४० पर्यटकांची बस नदीत कोसळली, १६ जणांना जलसमाधी, प्रवाशांची यादी समोर

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झालाय.
भयंकर! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली
Nepal bus accident :Social Media
Published On

Nepal Bus Accident Today : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा (Nepal bus accident latest news) मृत्यू झालाय, तर १३ जणांना वाचवण्यात यश आलेय. 10 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री ११.३० वाजता हा अपघात झाल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे.

देव दर्शन करण्यासाठी महराष्ट्रातील भाविक गेले होते. ११० जणांच्या ग्रुपने गोरखपूरवरुन तीन बस केल्या होत्या. त्यामधील एक बस मुखलिसपूरजवळ नदीत कोसळली. त्यामध्ये अनेक कुटुंब होती. आई-वडील-मुलं असे सह परिवार ते पर्यटनाला निघाले होते. त्याचवेळी काळाने घाला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक हे नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेले होते. प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. हे प्रवासी भुसावळ आणि आसपासच्या भागाती असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांची यादी समोर आली आहे.

भयंकर! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली
Nepal Bus Accident: नेपाळमधील बस अपघातात महाराष्ट्रातील १६ जणांचा मृत्यू
  1. अनंत ओंकार इंगळे

  2. सीमा अनंत इंगळे

  3. सुहास राणे

  4. सरला राणे

  5. चंदना सुहास राणे

  6. सुनील जगन्नाथ धांडे

  7. निलीमा सुनील धांडे

  8. तुळशीराम बुधो तायडे

  9. सरला तुळशीराम तायडे

  10. आशा समाधान बावस्कार

  11. रेखा प्रकाश सुरवाडे

  12. प्रकाश नथु सुरवाडे

  13. मंगला विलास राणे

  14. सुधाकर बळीराम जावळे

  15. रोहिणी सुधाकर जावळे

  16. विजया कडू जावळे

  17. सागर कडू जावळे

  18. भारती प्रकाश जावळे

  19. संदीप राजाराम सरोदे

  20. पल्लवी संदीप सरोदे

  21. गोकरणी संदीप सरोदे

  22. हेमराज राजाराम सरोदे

  23. रुपाली हेमराज सरोदे

  24. अनुप हेमराज सरोदे

  25. गणेश पांडुरंग भारंबे

  26. सुलभा पांडुरंग भारंबे

  27. मिलन गणेश भारंबे

  28. परी गणेश भारंबे

  29. शारदा सुनील पाटील

  30. कुमुदिनी रविंद्र झांबरे

  31. शारदा सुनील पाटील

  32. निलीमा चंद्रकांत जावळे

  33. ज्ञानेश्वर नामदेव बोंडे

  34. आशा ज्ञानेश्वर बोंडे

  35. आशा पांडुरंग पाटील

  36. प्रवीण पांडुरंग पाटील

  37. सरोज मनोज भिरुड

  38. पंकज भागवत भगाळे

  39. वर्षा पंकज भंगाळे

  40. अविनाश भागवत पाटील

  41. अनिता अविनाश पाटील

  42. मुर्तीजा (ड्रायव्हर)

  43. रामजीत (वाहक)

भयंकर! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली
Nepal Bus Accident: अपघातग्रस्त बसमधील सर्वच प्रवाशी महाराष्ट्रातील; ११० जणांचा होता ग्रुप

गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास UP-53- FT 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडुकडे निघाली होती. बसमध्ये सर्व ४० प्रवासी महाराष्ट्रातील होते. दरम्यान, काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हेलिपॅडवरून वैद्यकीय पथकाला घेऊन नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर तनहुन जिल्ह्यातील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे. नेपाळच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. अपघातस्थळी बचाव पथकाचं मदतकार्य सुरु आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वात नेपाळचं सैन्य दल, सशस्त्र पोलीस दलाचे जवान घटनास्थळी आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट -

नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो.

प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com